स्मरणशक्ती म्हटलं की स्वाभाविकच त्याचा मेंदूशी संबंध असतो. पण आपल्या शरीरातील स्नायूंनादेखील एक वेगळ्या प्रकारची स्मरणशक्ती असते जिला मसल मेमरी म्हणतात. म्हणजे काय तर आपल्या शरीरातील विशिष्ट अवयवाच्या स्नायूंना ठराविक हालचालींची सवय लावली तर त्या त्या परिस्थितीत ते अवयव विद्युतवेगाने क्षणार्धात ती हालचाल करतात, त्यासाठी विचार करण्याची गरज भासत नाही.

सूर्यकुमार यादवनं आपल्या यशाच्या संदर्भात मसल मेमरीला श्रेय दिलं आहे. याचा अर्थ सूर्यानं त्याला ज्या यशस्वी फटक्यांचा संदर्भ द्यायचाय ते फटके त्याने नेट्समध्ये अक्षरश: हजारोवेळा मारलेले आहेत. त्यांचा त्याने इतका सराव केलाय, तो विशिष्ट फटका खेळण्यासाठी परिस्थिती आली की त्याच्या हाता-पायाचे व संबंधित अवयवांचे स्नायू विद्युतवेगाने कार्य करतात आणि तो फटका खेळला जातो. याचं उदाहरण म्हणजे १४०च्या वेगाने आलेल्या चेंडूवर सातत्याने स्विपसारखा फटका खेळून षटकार मारणे.

Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
Jake Fraser Mcgurk Statement on Jasprit Bumrah
IPL 2024: जेक फ्रेझरचे बुमराहविरूद्धच्या फटकेबाजीवर मोठे वक्तव्य, म्हणाला ‘मी दिवसभर बुमराहच्या गोलंदाजीचे …’
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?

गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटताक्षणी त्याचा वेग किती असेल, त्याचा टप्पा कुठे पडेल व त्याची उसळी किती असेल याचा क्षणार्धात अंदाज येऊन संबंधित सर्व स्नायू विद्युतवेगाने काम करतात. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की ऑफ स्टंपच्या बाहेर, यॉर्कर लेंग्थचा १४० किमी प्रति तास गतीचा चेंडूही सूर्या पटकन पोझिशन घेऊन स्विप करू शकतो व षटकार मारू शकतो. आपल्याला बघायला चित्तथरारक वाटणारा हा फटका सातत्याने खेळण्यासाठी नेट्समध्ये या फटक्याचा त्याने शेकडो तास सराव केला असणार हे उघड आहे. त्यामुळे चेंडू कसा असेल याचं मेंदूला झालेलं आकलन व त्यानंतर शरीराच्या स्नायूंनी केलेल्या विद्युतवेगी हालचाली यामुळे एखाद्या यंत्राने खेळावा इतका क्लिनिकल फटका तो खेळू शकतो.

सूर्या’चं असणं मुंबई इंडियन्ससाठी इतकं का महत्त्वाचं?

सूर्या खेळतो तो स्विप असेल, रोहित शर्माचा किंवा स्मृती मनधानाचा पूल असेल, दिनेश कार्तिक, यशस्वी जयस्वाल आदी खेळत असलेला स्कूप असेल वा विराट कोहलीचा प्रचंड हुकूमत असलेला कव्हर ड्राइव्ह असो, अशा फटक्यांवर सत्ता गाजवण्यासाठी त्या त्या फटक्यांचा नेट्समध्ये इतका सराव केला जातो की संबंधित अवयवांसाठी तो फटका मारणं एक यंत्रवत काम होऊन जातं कारण त्या त्या मसल्सच्या मेमरीमध्ये तो फटका घट्ट बसलेला असतो. आपण म्हणतो की माणूस सवयीचा गुलाम असतो. माणूसच नाही तर त्याचे अवयव, स्नायू सगळं काही सवयीचे गुलाम असतात. त्या त्या अवयवांना, मसल्सना ठराविक हालचालींचा प्रचंड सराव देऊन गुलाम करणं म्हणजे ‘मसल मेमरी’.