scorecardresearch

Suryakumar on Lucknow Pitch: ताळमेळचा अभाव! लखनऊच्या खेळपट्टीबाबत कर्णधार हार्दिकच्या मतावर सूर्यकुमार असहमत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनऊमध्ये खेळला गेला, जिथे खेळपट्टीने फिरकीपटूंना खूप मदत केली. कमी धावसंख्येच्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवचे ऑन-पिच विधान हृदयाला भिडणारे आहे.

Suryakumar Yadav: Surya gave a different statement from Hardik on the Lucknow pitch controversy the curator was on leave
सौजन्य- (ट्विटर)

Suryakumar Yadav on Lucknow Pitch: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यापूर्वी, सूर्यकुमार यादवने मागील सामन्यातील खेळपट्टीशी संबंधित एका प्रश्नाला धक्कादायक उत्तर दिले आहे. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना लखनऊमध्ये खेळला गेला, जिथे फलंदाज केवळ धावा करू शकले नाहीत. कर्णधार हार्दिक पांड्याने तर सांगितले होते की, ही एक धक्कादायक विकेट होती आणि आपण चांगल्या विकेट्स बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

या प्रकरणी संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या कर्णधाराला उलट उत्तर दिले. तो म्हणाला, “तुम्ही कोणत्या मातीवर खेळत आहात मग ती काळी किंवा लाल मातीची खेळपट्टी याने काही फरक पडत नाही. या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या नियंत्रणात नाहीत. जे काही आमच्या नियंत्रणात होते ते आम्ही शेवटच्या सामन्यात केले. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खेळायचे असले तरी त्याच्याशी जुळवून घेऊन आपली रणनीती राबवावी लागते मागील सामना तो एक रोमांचक झाला होता. खेळपट्टीची स्थिती काहीही असो, फॉरमॅट काहीही असो, दोन संघ एकमेकांना खडतर स्पर्धा देत असतील तर इतर गोष्टींना काही फरक पडत नाही. अशा परिस्थितीत विकेटनेही फारसा फरक पडू नये. तुम्ही मैदानात उतरा, आव्हान स्वीकारा आणि पुढे जा.”

हा सामना खूपच कमी धावसंख्येचा होता आणि परिस्थिती अशी होती की २० षटके खेळूनही न्यूझीलंडचा संघ आठ विकेट्सवर केवळ ९९ धावाच करू शकला. १०० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी टीम इंडियाने १९.५ षटकेही घेतली. लखनऊच्या खेळपट्टीबाबत बराच गदारोळ झाला होता आणि खेळपट्टीच्या क्युरेटरचीही हकालपट्टी करण्यात आली होती. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने सामन्यानंतर खेळपट्टीबद्दल खूप संकोच केला आणि ही खेळपट्टी धक्का देण्यापेक्षा कमी नसल्याचे सांगितले. त्याचवेळी टीम इंडियाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादवला जेव्हा खेळपट्टीबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याचे उत्तर हार्दिक पांड्यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते.

हेही वाचा: Suryakumar Yadav: ‘टी२० रांची में चालू हुआ था…’ सुर्याच्या मते ‘फिनिशर’ म्हणजे केवळ माही! पत्रकाराच्या प्रश्नाला हटके उत्तर, पाहा video

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत सहभागी होण्यासाठी आला होता. लखनऊमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर लगेचच हार्दिक म्हणाला होता की, ही खेळपट्टी धक्का देण्यापेक्षा कमी नाही. सध्या मालिका १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये खेळला गेला, जो न्यूझीलंडने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने ६ विकेट्सने विजय मिळवला. लखनऊमध्ये ३१ चेंडूत नाबाद २६ धावा करणारा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला. केवळ टीम इंडियाच नाही तर चाहते आणि तज्ज्ञांनीही लखनऊच्या खेळपट्टीवर टीका करत ती टी२० क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने म्हटले होते की, “जर अनेक खेळाडूंनी ही खेळपट्टी पाहिली तर त्यांनी आयपीएल खेळण्यासाठी लखनऊला येऊ नये.”

हेही वाचा: Shahid Afridi: पाकिस्तान बोर्डाचा अजब कारभार! प्रशिक्षकाच्या निर्णयावर शाहीद आफ्रिदी संतापला म्हणाला, “आता काय ऑनलाईन क्रिकेट…”

एकदिवसीय आणि टी२०च्या परिस्थिती वेगळ्या आहेत

एकदिवसीय आणि टी२०च्या परिस्थिती वेगळ्या आहेत तरीही एकदिवसीय आणि टी२० सामन्यामध्ये खूप फरक आहे. जिथे टी२० मध्ये वेगवान फलंदाजी असते, तिथे फलंदाजांना वन डेतील परिस्थितीनुसार जुळवून घ्यावे लागते. टी२० क्रिकेटमध्ये जवळचे क्षेत्ररक्षक नसतात, त्यामुळे चेंडू बॅटच्या काठाला लागूनही अनेक वेळा चौकारांसाठी जातो. दुसरीकडे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये, स्लिप किंवा जवळच्या भागात क्षेत्ररक्षक असतात. अशा परिस्थितीत, वेळेत थोडासा चूक झाल्यामुळे बॅटर झेलला जाऊ शकतो. सुर्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये थोडी सावधगिरीने फलंदाजी केली तर तो मोठी धावसंख्या उभारू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 13:36 IST