महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने तिन्ही आयसीसी चषक उंचावले आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं होतं. जगभरात कॅप्टन कूल अशी ओळख असलेल्या धोनीला त्याच्या चाहत्यांनी थाला (तला – leader) हे नवीन नाव दिलं आहे. धोनीने एखादी मोठी कामगिरी केली, मुलाखतीत हजरजबाबीपणाचं दर्शन घडवलं किंवा सामाजिक क्षेत्रात काहीतरी केल्यावर त्याचे चाहत्या तला किंवा तला फॉर अ रिजन हा हँशटॅग ट्रेंड करतात. तला हा एक तमिळ शब्द असून त्याचा अर्थ लीडर, प्रमुख किंवा नेतृत्व करणारा असा होतो. दरम्यान, धोनीने नुकतंच एका कार्यक्रमात जर्सीसाठी ७ हा क्रमांक का निवडला यामागचं कारण स्पष्ट केलं. त्यानंतर पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर तला फॉर अ रिजन (Thala for a reason) हा ट्रेण्ड सुरू झाला आहे.

धोनीच्या देदिप्यमान कामगिरीमुळे आणि त्याच्या जगभर असलेल्या असंख्य चाहत्यांच्या मागणीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कुठल्याही खेळाडूला सात नंबरची जर्सी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कुठलाही भारतीय खेळाडू या क्रमांकाची जर्सी परिधान करून खेळू शकणार नाही. बीसीसीआयने सचिन तेंडुलकरच्या १० नंबरच्या जर्सीनंतर धोनीची ७ नंबरची जर्सी निवृत्त केली आहे.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

दरम्यान, धोनीने एका मुलाखतीमध्ये जर्सीसाठी ७ हा क्रमांक का निवडला यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. धोनीचं हे कारण ऐकून त्याच्या चाहत्यांनी समाजमाध्यमांवर तला फॉर अ रिजन (Thala for a reason) हा हँशटॅग ट्रेण्ड केला आहे. धोनी म्हणाला, मी पृथ्वीवर पाऊल ठेवण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी ७ जुलै १९८१ हा दिवस ठरवला होता. मी सातव्या महिन्यातील सातव्या दिवशी जन्मलो. १९८१ हे वर्ष होतं. ८ मधून १ हा अंक वजा केला तर ७ हे उत्तर येतं. म्हणून मी ७ नंबरची जर्सी निवडली. जेव्हा मला विचारण्यात आलं की, तू कुठल्या क्रमांकाची जर्सी परिधान करणार? तेव्हा जर्सीचा क्रमांक ठरवणं माझ्यासाठी खूप सोपं होतं.

महेंद्रसिंग धोनीची कोट्यवधींची फसवणूक!

माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे ​​मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरुद्ध रांची येथील न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. दिवाकरने २०१७ मध्ये धोनीबरोबर जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी करार केला होता. त्याच्या अटींचे पालन करण्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे धोनीने १५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.