scorecardresearch

T20 World Cup : संघ जिंकणार, खेळाडूही होणार मालामाल! ICC कडून बक्षिसांची आकडेवारी जाहीर; विजेत्या संघाला मिळणार…

यावर्षीच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळणार आहे.

T20 World Cup : संघ जिंकणार, खेळाडूही होणार मालामाल! ICC कडून बक्षिसांची आकडेवारी जाहीर; विजेत्या संघाला मिळणार…
टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळणार आहे. (AP)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने पुरुष टी२० विश्वचषक २०२२ साठीच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. ही स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार आहे. यासाठी प्रत्येक संघाने कंबर कसली आहे. यावर्षीच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळणार आहे.

आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार, यंदा टी२० विश्वचषक २०२२ चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला १.६ मिलियन यूएस डॉलर म्हणजेच जवळपास १३ कोटी ४ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम फेरीमध्ये हरणाऱ्या संघाला ८ लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास ६ कोटी रुपये दिले जातील. या बातमीनंतर प्रत्येकालाच आनंद झाला आहे. तथापि, ही रक्कम आयपीएल जिंकणाऱ्या संघाला मिळणाऱ्या रकमेपेक्षा सुमारे ३५ टक्के कमी आहे. आयपीएल विजेत्याला जवळपास २० कोटी रुपयांचे रोख बक्षीस मिळते.

इतकंच नाही तर सेमी फायनलला पोहोचणाऱ्या संघांनाही ४ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ३ कोटी २५ लाख रुपये मिळणार आहे. या स्पर्धेसाठीची एकूण धनराशी ५.६ मिलियन डॉलर म्हणजेच ४६ कोटी रुपये असेल.

Jasprit Bumrah: खतम, टाटा, बायबाय! T20 चषकातून जसप्रीत बुमराह बाहेर पडल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पूर

सुपर-१२ मधून बाहेर पडलेल्या आठ संघांना प्रत्येकी ७० हजार डॉलर म्हणजेच ५७ लाख रुपये मिळतील. गेल्या वर्षीप्रमाणेच सुपर-१२ मधील प्रत्येक सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाला ४० हजार डॉलर्स म्हणजेच ३२ लाख ५३ हजार रुपये मिळतील. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या आठ संघांनी सुपर-१२ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

उर्वरित आठ संघांचे चार-चारच्या दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. ‘गट अ’मध्ये नामिबिया, श्रीलंका, नेदरलँड्स, यूएई तर वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे ब गटात आहेत. या संघांना पहिल्या फेरीत खेळायचे आहे. २०२१ मध्ये युएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ विजेता ठरला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या