ज्या व्यक्तींना हृदयविकार त्रास आहे, त्यांच्यासाठी शारीरिक हालचाल, व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. त्यात उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि मधुमेह असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. याचबरोबर तुम्ही जर हृदयरोगी असाल, तर तुम्हाला दररोज नियमित चालणे आवश्यक आहे. सकाळी किंवा तुम्हाला वेळ भेटेल तसे चालावे. त्यानुसार तुमचे शरीर निरोगी राहते. व हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.
हृदय रुग्णांसाठी व्यायाम
जर तुम्ही हार्ट पेशंट असाल तर सर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांशी बोला. त्यानंतरच कोणताही व्यायाम किंवा योगा सुरू करा. यासाठी आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुमची स्थिती पाहता कोणता व्यायाम तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे हे डॉक्टर सांगतील. त्यांच्या सल्ल्यानुसार व्यायामाला सुरुवात करावी. व्यायामामुळे तुमचा रक्तदाबही कमी होईल, कोलेस्टेरॉल कमी होईल तसेच मधुमेह नियंत्रणात राहील.
हे व्यायाम करू शकता
एरोबिक्स करा, यामुळे हृदय आणि फुफ्फुस दोन्ही चांगले कार्य करतात. हृदयाचे रक्त परिसंचरण चांगले होते. परंतु हे नेहमी लक्षात ठेवा की त्याची सुरुवात खूप भारी व्यायामापासून करू नये.
तुम्ही स्विमिंग देखील करू शकता परंतु स्विमिंग करताना जास्त दबाव नसावा. कोणताही व्यायाम आठवड्यातून तीन ते चार वेळा करा, पण लक्षात ठेवा की फक्त हलका व्यायाम केला पाहिजे.
तसेच चालणे हा सर्वात उत्तम प्रकार आहे. चालल्याने उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि मधुमेह नियंत्रित राहते.
कोणताही व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही शरीराला हलके स्ट्रेच करणे खूप महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त व्यायाम पूर्ण झाल्यानंतर थोडावेळ थांबून रीलॅक्स व्हा.
या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना डोकेदुखी, छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते त्वरित थांबवा आणि ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.