27 February 2021

News Flash

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर?; मोदींवर टीका करणारं ‘ते’ ट्विट तासाभरातच डिलीट

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरील सस्पेन्स कायम

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबद्दलची चर्चा रंगलेली असून रोज वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट करत आपल्या प्रवेशाचे सूचक संकेत देणाऱ्या एकनाथ खडसे यांनी तासाभरातच माघार घेतल्याने आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारं ट्विट रिट्विट केल्यानंतर ते डिलीट केलं आहे.

ट्विटमध्ये काय लिहिलं होतं
नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासियांना संबोधून भाषण केलं. त्यांच्या या भाषणावर टीका करणारं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला”.

खडसे यांना राष्ट्रवादीचा हिरवा कंदील
“विरोधी पक्षातील प्रभावी व्यक्ती म्हणून एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येते. एक पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, मेहनत आणि जिद्द लक्षात घेतल्यानंतर आपली नोंद घेतली जात नाही, असे वाटत असेल आणि त्यातून एका विचाराकडे माणूस जातो. जेथे नोंद घेतली जाते तेथे जावे का, असे वाटत असेल आणि एखाद्या पक्षाविषयी तसे वाटत असेल तर चांगलेच आहे,” असं म्हणत शरद पवार यांनी खडसे प्रवेशाला हिरवा कंदील दाखविला.

नाथाभाऊ कुठे जाणार नाहीत – चंद्रकांत पाटील
दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी बोलताना म्हटलं होतं की, “नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभागी होतील”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 11:19 am

Web Title: bjp leader eknath khadse deletes retweet of ncp jayant patil criticising pm narendra modi sgy 87
Next Stories
1 महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी सुरुच राहाणार! आयसीएमआरच्या भूमिकेला छेद
2 “बोलघेवडेपणा सोडा आणि कृती करा,” फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
3 भारतीय पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट; त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान- अजित पवार
Just Now!
X