रत्नागिरी – कोकणातील गणेशोत्सव कालावधीत कोकणात येणा-या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता या चाकरमान्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून गुजरातसह मुंबई, पुणे येथून कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्यांमध्ये पश्चिम रेल्वेकडून ५, तर मध्य रेल्वेकडून ११ गणपती विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
हजारो भाविक दरवर्षी आपल्या कोकणातील गावी गणेशोत्सवासाठी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने ५ फेऱ्या जाहीर केल्या आहेत तर मध्य रेल्वेने ११ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या कोकण रेल्वे मार्गे धावणार असून, मुंबई, पुणे तसेच लो. टिळक टर्मिनस मुंबई येथून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव व चिपळूण या स्थानकांपर्यंत या विशेष फेऱ्या धावणार आहेत.
मध्य रेल्वेने घोषित केलेल्या गाड्यांमध्ये…
- ०११५१/५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी – मुंबई (रोज),
- ०११५३/५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई (रोज),
- ०११६७/६८ लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (दैनिक),
- ०११७१/७२ लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (दैनिक),
- ०११८५/८६ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक),
- ०११६५/६६ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक),
- ०१४४७/४८ पुणे – रत्नागिरी पुणे (साप्ताहिक) ०१४४५/४६ – पुणे रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक),
- ०११०३/०४ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी – मुंबई (दैनिक),
- ०११२९/३० लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी – मुंबई (साप्ताहिक),
- ०११५५/५६ – दिवा – चिपळूण – दिवा (रोज)
या गाड्यांचा समावेश आहे.
या सर्व गाड्या गणेशोत्सव काळात भाविकांच्या अतिरिक्त गर्दीची आवश्यकता लक्षात घेऊन सुरू करण्यात आल्या आहेत. याबरोबर पश्चिम रेल्वेनेही कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ९०११/१२ मुंबई सेंट्रल ते ठोकर (साप्ताहिक) ०९०१९/२० ०९०१९/२० मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी (आठवड्यातील चार दिवस ४ दिवस), ०९०१५/१६ वांद्रे ते रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी, ०९११४/१३ बडोदा ते रत्नागिरी (साप्ताहिक), ०९११०/०९ विश्वामित्रा ते रत्नागिरी (साप्ताहिक) या पाच विशेष गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच खुले करण्यात येणार आहे.