Eknath Shinde Dasara Melava 2022 Updates at BKC Ground : दसऱ्यानिमित्त राज्यात आज (५ ऑक्टोबर) तीन मोठ्या राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे झाले. यात पहिला मेळावा दुपारी भगवान भक्तीगडावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा झाला. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर सुरू झाला. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेना आणि महाविकासआघाडीवर सडकून टीका केली. वाचा दसरा मेळाव्यातील घडामोडींच्या प्रत्येक अपडेट्स… व्हिडीओ पाहा.