Mumbai News Today : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन अद्यापही सुरू आहे. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांनी उपोषण काल (१४ सप्टेंबर) मागे घेतलं. यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवली सराटी येथे उपोषणस्थळी पोहोचले होते. दरम्यान, जम्मू काश्मिरातील दहशतवादी हल्ला, भाजपा कार्यालयात झालेली पुष्पउधळण, सनातन धर्म आदी मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. तर, दुसरीकडे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगितलं जातंय. यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा.

Live Updates

Maharashtra News Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

18:18 (IST) 15 Sep 2023
शासकीय कार्यालयातील कंत्राटी पदभरतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘ही पदभरती तात्पुरत्या…’

पुणे : राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पद भरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पद भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले.

सविस्तर वाचा

17:45 (IST) 15 Sep 2023
'येथे' भरतो बैलांऐवजी ट्रॅक्टर पोळा!, काय आहे कारण जाणून घ्या…

बुलढाणा: जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा होतो. मात्र मेहकरात ट्रॅक्टर पोळ्याची संकल्पना आता चांगलीच रुळली आहे. यंदाच्या पोळ्यातही ही अभिनव परंपरा कायम राहिली.बैलांचे घटते प्रमाण, त्यामुळे शेतीचे झालेले यांत्रिकीकरण, बैला ऐवजी ट्रॅक्टरने होणारी कामे यामुळे मेहकर मध्ये आता आधुनिक पद्धतीने पोळा भरतो.

सविस्तर वाचा

17:22 (IST) 15 Sep 2023
भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटांत शस्त्रक्रिया; ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ तंत्रज्ञानाद्वारे थायरॉईडग्रस्त महिलेला दिलासा

थायरॉईडच्या ग्रंथींमुळे घशाला सूज आल्याने खाण्या-पिण्यास त्रास होणार्‍या ३२ वर्षीय महिलेवर ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ (एमव्हीए) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

सविस्तर वाचा...

17:03 (IST) 15 Sep 2023
गोंदियात मुसळधार पाऊस; रस्ते बंद; मारबत-बडगे मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण

गोंदिया: जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून अधून मधून पाऊस पडत होता. मात्र गुरुवारी सायंकाळी ४ बैलपोळा एन भरात असताना सुरू झालेला पाऊस रात्र भर बरसला आणि शुक्रवारी पहाटे पासून तर चक्क मुसळधार पावसाला सुरुवात झाली ती सकाळी ११ वाजता पर्यंत सातत्याने वाढत तर काहीशी ओसरत पाऊस सुरूच राहिला.

सविस्तर वाचा

16:51 (IST) 15 Sep 2023
प्रभादेवी नाक्यावर स्वागत मंडपांना पोलिसांनी परवानगी नाकारली; गेल्यावर्षी ठाकरे आणि शिंदे गटांतील वादानंतर झाला होता गोळीबार

गेल्यावर्षी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानंतर वाद झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर दादर पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबार झाला होता.

सविस्तर वाचा...

16:38 (IST) 15 Sep 2023
मेथी पाठोपाठ कोथिंबीर ही वधारली; घाऊक मध्ये प्रतिजुडी २०-२५ रुपये तर किरकोळीत ३०-४० रुपये

नवी मुंबई: उन्हाळ्यात महाग असणाऱ्या फळभाज्या पावसाळा सुरू होताच स्वस्त होण्यास सुरुवात होत असते परंतु पावसाळ्यात पालेभाज्यांचे भाव वधारतात.

सविस्तर वाचा...

16:35 (IST) 15 Sep 2023
प्लास्टिकच्या बाटल्या काढताना नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू

प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करताना एक व्यक्ती पाय घसरून गुरुवारी विक्रोळीमधील नाल्यात वाहून गेली.

सविस्तर वाचा...

16:16 (IST) 15 Sep 2023
मोहोळ टोळीकडून खंडणीसाठी पुण्यातील दोन महिलांचे अपहरण; महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश

स्टॉल न मिळाल्याने बाबुलाल आणि त्याच्या साथीदारांनी कात्रज आणि वारजे परिसरातून दोन महिलांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले होते.

सविस्तर वाचा...

15:54 (IST) 15 Sep 2023

https://x.com/Central_Railway/status/1702627234157388033?s=20

15:21 (IST) 15 Sep 2023
मुंबई : कोकणवासियांसाठी दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त डबे

दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसला शुक्रवारपासून तृतीय श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात आले.

सविस्तर वाचा...

15:04 (IST) 15 Sep 2023
पोळ्याच्या दिवशी प्रगतशील शेतकऱ्याच्या अवयव दानातून सहा कुटुंबात प्रकाशाची पेरणी

सेलू तालुका येथील प्रयोगशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांना कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचे पुरस्कार सुद्धा मिळाले आहे.

सविस्तर वाचा...

14:59 (IST) 15 Sep 2023
खैराची तस्करी करणारे दोन जण ताब्यात; बाऱ्हे वनपरिक्षेत्रात लाकूड चोरी रोखण्यात यश

नाशिक: जिल्ह्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागालगत असलेल्या जंगलांमध्ये पुन्हा लाकूड चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या जंगलातील खैरांवर सर्रासपणे कटर फिरवित असल्याने वनविभागही सतर्क झाला आहे.

सविस्तर वाचा...

14:58 (IST) 15 Sep 2023
कॅबिनेट बैठक की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन? विजय वडेट्टीवारांचा सवाल

https://x.com/VijayWadettiwar/status/1702610701083361446?s=20

14:36 (IST) 15 Sep 2023
लवकरच सीएसएमटी स्थानकात २४ डब्ब्यांच्या एक्स्प्रेसला थांबा; फलाट विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील ४५ टक्के काम पूर्ण

सीएसएमटीवरून दररोज ९० लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. मात्र फलाट क्रमांक १० ते १४ ची लांबी कमी असल्याने येथे २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहू शकत नाही.

सविस्तर वाचा...

14:25 (IST) 15 Sep 2023
Marbat Procession नागपूर: ईडा पिडा, रोगराई, संकटे, भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन जा गे मारबत….

Marbat Procession in nagpur नागपूर : ईडा पिडा, रोग राई, जादू टोना, संकटे घेऊन जा गे मारबत…. अशा घोषणा देत भर पावसात नागपुरात ढोल ताशाच्या गजरात सकाळी मारबत बडग्या मिरवणूक निघाली. लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मारबत बघण्यासाठी लाखोंची गर्दी रस्त्यांवर उतरली होती.

सविस्तर वाचा

14:11 (IST) 15 Sep 2023
कांदा व्यापाऱ्यांना हजार फुटांचे गाळे? मोफत गाळ्यांसाठी निधी उभारणीची धडपड

नवी मुंबई: वाशी आणि तुर्भे या दोन उपनगरांच्या वेशीवर असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्वसन प्रकल्पात एक हजार चौरस फुटाचे गाळे मिळावेत यासाठी येथील व्यापाऱ्यांनी आग्रह धरला आहे.

सविस्तर वाचा...

14:07 (IST) 15 Sep 2023
ईडीचे मुंबईसह देशभरात ३९ ठिकाणी छापे; ४१७ कोटींची मालमत्ता जप्त, सेलिब्रिटींनीही हवालामार्फत पैसे स्वीकारले

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आले असून अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केले होते.

सविस्तर वाचा...

14:01 (IST) 15 Sep 2023
डोंबिवली एमआयडीसीतील विको नाक्याला हातगाड्यांचा विळखा, मालवाहू वाहनांना कोंडीचा फटका

येथील औद्योगिक विभागातील विको नाक्याला चहुबाजुने हातगाड्यांचा विळखा असतो. या हातगाडयांमुळे विविध प्रांतामधून कंपन्यांच्यामध्ये कच्चा, पक्का माल घेऊन आलेले मालवाहू ट्रक जाण्यासाठी प्रशस्त रस्ता नसल्याने वाहने अडकून पडतात. सविस्तर वाचा…

14:00 (IST) 15 Sep 2023
भंडाऱ्यात पावसाचे दमदार पुनरागमन, वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ

दीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात दमदार पावसाचे पुनरागमन झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी-नाले दुथडी भरून तर ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागले आहे. सविस्तर वाचा…

13:45 (IST) 15 Sep 2023
साडेबाराचे जनक दिबांचे गाव योजनेपासून वंचित; जासई ग्रामस्थांचा गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम बंद करण्याचा इशारा

उरण: देशातील शेतकऱ्यांना मोबदला म्हणून साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे तत्व प्रस्तापित करणाऱ्या माजी खासदार दि. बा. पाटील यांचे जासई गावच या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

सविस्तर वाचा...

13:20 (IST) 15 Sep 2023
ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोण खेळतयं? अर्थमंत्र्यांच्या बैठकीनंतर आधार योजना, वसतिगृह अधांतरी

नागपूर : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी ७२ वसतिगृहांच्या साहित्य खरेदीचा आणि वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आधार योजनेचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्याने या दोन्ही बाबतीत चालू शैक्षणिक सत्रात लाभ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 15 Sep 2023
भाईंदर: खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने खेळाडूचा मृत्यू

भाईंदर: भाईंदरमध्ये फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडकी. तपन बिस्वास( ४६)असे या मयत खेळाडूचे नाव आहे.

वाचा सविस्तर...

13:10 (IST) 15 Sep 2023
उरणच्या एन एम एम टी बस मधील भटक्या श्वानांमुळे प्रवासी त्रस्त; नागरिकांना घाणीची समस्या आणि श्वानांच्या हल्ल्याचा धोका

उरण: शहरातील पेन्शनर्स पार्क येथे रात्रीच्या वेळी उभ्या करण्यात येणाऱ्या एन एम एम टी बसेसचे दरवाजे उघडे राहत असल्याने या बस मध्ये मोकाट श्वान बस मधील असनांवर बसत आहेत.

सविस्तर वाचा...

13:06 (IST) 15 Sep 2023
Video: चालत्या लोकलमध्ये तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी

वसई: विरार ते चर्चगेट चालत्या लोकल मध्ये एका तरुणाने जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित होऊ लागली आहे.

वाचा सविस्तर...

12:59 (IST) 15 Sep 2023
“ होय मेट्रोची कनेक्टिव्हीटी वाढवण्यात आम्ही कमी पडलो, पण … ” काय म्हणाले मेट्रोचे एम.डी.

नागपूर : महामेट्रोचा प्रकल्प उभारण्याइतकेच प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचे दीर्घकाळापर्यंत संचालन करणे हे आव्हानात्मक काम आहे. सध्या मेट्रोतून दररोज ८० हजार प्रवासी प्रवास करीत आहे. मेट्रोची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्यात आम्ही कमी पडलो, ही संख्या दोन लाखांवर नेण्याचे आमचे प्रयत्न आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी सांगितले.

सविस्तर वाचा

12:55 (IST) 15 Sep 2023
VIDEO : “अख्खा डोंगर खणायचा बाकी आहे”, मुंबई-गोवा महामार्गाबाबत मनसेचा ग्राऊंड रिपोर्ट

२०१० साली मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर कामाला सुरुवात झाली होती. पण २०२३ सरायला आले तरी महामार्गाचे काम मार्गी लागलेले नाही. दुसऱ्या टप्प्यातील कामाची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करत असले तरी कामाची गती लक्षात घेता यंदाही चाकरमान्यांचा कोकण प्रवास खडतर राहण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही याविरोधात आवाज उठवला होता. आज त्यांनी ग्राऊंड रिपोर्टच सादर केला आहे.

सविस्तर वाचा

12:49 (IST) 15 Sep 2023
मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्सना टाळे; १५ दिवसांत ७० हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पाली येथील ‘पापा पन्चो दा ढाबा’ या हॉटेलमध्ये एका व्यक्तीला जेवणामध्ये मृत उंदीर सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.

सविस्तर वाचा...

12:31 (IST) 15 Sep 2023
शिस्तभंगाचा ठपका! गडचिरोलीत रुजू होण्यास टाळाटाळ करणारे तीन तहसीलदार निलंबित

गडचिरोली: राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागास व दुर्गम गडचिरोलीत झालेली पदस्थापना शिक्षा समजून अनेक अधिकारी रुजू होत नाहीत किंवा पदस्थापना बदलून घेतात. जिल्ह्यात पदस्थापना मिळालेले तीन तहसीलदार अडीच महिन्यांपासून रुजू झाले नव्हते.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 15 Sep 2023
पत्नीला मारहाण करणाऱ्याला न्यायालयाचा तडाखा; घरात प्रवेश बंदी

पत्नीशी संपर्क साधू नये, तसेच तिच्या घरात प्रवेश करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पतीकडून चारित्र्याचा संशय घेऊन छळ करण्यात येत होता.

सविस्तर वाचा...

12:23 (IST) 15 Sep 2023
नागपूर: अधिकाऱ्यांनी मनात आणले तर काय घडते..जाणून घ्या ‘ई-पंचनाम्याची कमाल !

नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्यासाठी नागपूर विभागाने प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या ई-पंचनामा प्रयोगामुळे दहा दिवसांत माहिती संकलन शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा

Maharashtra Breaking News Live Updates

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Maharashtra Live News Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा