Mumbai Breaking News Update : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांनी घोषित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून कालपासून त्यांच्या सभांचा झंझावात सुरू झाला आहे. राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेस आणि मविआमधील पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. १७ मार्च रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मविआची सभा होणार आहे. त्याआधी मनसेकडून राहुल गांधींना इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येऊन यावेळी स्वा. सावरकर यांच्याबद्दल बोलाल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

भाजपाची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातून २० उमेदवारांची घोषणा

supriya sule ajit pawar (3)
राष्ट्रवादीतील घराणेशाहीबाबत विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हो बरोबरच आहे, मी आणि अजितदादा…”
rohit pawar on devendra fadnavis god gift statement
“देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून…” रोहित पवारांची खोचक टीका!
Lok Sabha Election 2024 Live Updates in Marathi
Lok Sabha Election 2024 Live : “मोदींना फक्त चारच जाती माहीत आहेत, पहिली म्हणजे…”, नारायण राणेंचं विधान
eknath shinde
“लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; नेमका रोख कुणाकडे?

भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश असून नागपूरमधून अखेर नितीन गडकरी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तर बीडमधून पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर केले आहे.

दुसऱ्या यादीत भाजपाने चार खासदारांचा पत्ता केला कट

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्याजागी पियूष गोयल यांना तर मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड लोकसभेतून प्रीतम मुंडे यांच्याजागी पंकजा मुंडे, तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याजागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली गेली आहे.

Live Updates

Maharashtra News Today 13 March 2024

19:22 (IST) 13 Mar 2024
महाराष्ट्रातील भाजपाच्या २० उमेदवारांपैकी चार महिला उमेदवार

भाजपाने दुसऱ्या यादीत २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी चार महिला उमेदवार आहेत. नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, जळगावसाठी स्मिता वाघ, रावेर लोकसभेसाठी रक्षा निखिल खडसे, दिंडोरी लोकसभेसाठी डॉ. भारती पवार आणि बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

19:19 (IST) 13 Mar 2024
दुसऱ्या यादीत भाजपाने या खासदारांचा पत्ता केला कट

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्याजागी पियूष गोयल यांना तर मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड लोकसभेतून प्रीतम मुंडे यांच्याजागी पंकजा मुंडे, तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याजागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली गेली आहे.

19:12 (IST) 13 Mar 2024
भाजपाची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातून २० उमेदवारांची घोषणा

भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश असून नागपूरमधून अखेर नितीन गडकरी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तर बीडमधून पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1767907705954443279

18:55 (IST) 13 Mar 2024
पीएसआय मुख्य परीक्षेचा निकाल एमपीएससीकडून जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२२ या परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

सविस्तर वाचा...

18:30 (IST) 13 Mar 2024
हातकणंगलेत ‘मविआ’ उमेदवार देणार; राजू शेट्टींना आव्हान?

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीने निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आजच्या बैठकीत दिसून आली असून तिरंगी लढतीची चिन्हे दिसू लागली आहेत.

सविस्तर वाचा...

17:47 (IST) 13 Mar 2024
विट्यात उपप्रादेशिक परिवहनसाठी शासन सकारात्मक

सांंगली : विटा येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरू करण्यास शासन सकारात्मक आहे. मात्र कार्यालय सुरू होईपर्यंत या ठिकाणी वाहन नोंदणीसह विविध कामासाठी दुप्पट शिबीरांचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

खानापूर मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीस उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खानापूर मतदार संघाच्या विकास कामासाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांच्या पश्‍चात या मतदार संघातील विकास कामांना प्राधान्याने गती दिली पाहिजे. सर्वच विभागानी समन्वयाने कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

17:34 (IST) 13 Mar 2024
“या देशाला काँग्रेसने नव्हे भाजपनेच लुटले”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

वाशिम : हे थापाडे सरकार असून ही ‘भाजप’ नसून ‘भाडोत्री जनता पार्टी’ आहे. त्यांच्या इंजिनला भ्रष्टाचाराची चाके आहेत.असा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला.

सविस्तर वाचा...

17:33 (IST) 13 Mar 2024
खबरदार! लोकसभेसाठी खर्च ९५ लाखांवर गेला तर…, उमेदवारांवर यंत्रणांचे राहणार लक्ष

बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी ९५ लाख रुपये कमाल खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे.

सविस्तर वाचा...

17:32 (IST) 13 Mar 2024
श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर करताच भाजपाकडून नाराजी व्यक्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथील सभेत खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता भाजपाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, श्रीकांत शिंदे हे काही अधिकृत व्यक्ती नाहीत की, त्यांनी उमेदवारी जाहीर करावी. महायुतीचे जागावाटप हे तीनही पक्षातील वरिष्ठ नेते जाहीर करतील.

17:15 (IST) 13 Mar 2024
नाशिक : एटीएम फोडूनही रक्कम चोरण्यात अपयशी

नाशिक : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसीत असलेल्या सारस्वत बँकेचे एटीएम चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांना रक्कम असलेला भाग उघडण्यात अपयश आल्याने रक्कम सुरक्षित राहिली.

वाचा सविस्तर...

16:40 (IST) 13 Mar 2024
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा; काय आहे अजेंडा जाणून घ्या

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ ते १७ मार्च दरम्यान नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिर परिसरात होणार आहे.राम मंदिर निर्माणानंतर त्यासंदर्भातील पुढील योजना, संघाचे शताब्दी वर्ष, शाखांचा विस्तार अशा महत्त्वाच्या विविध प्रस्तावांवर चर्चा होणार आहे.

सविस्तर वाचा

15:59 (IST) 13 Mar 2024
ठाण्यातील शिंदेशाही संपवायची आहे का? अजित पवार गटाचा संतप्त सवाल

पुरंदरचे माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अजित पवार गटाच्या वतीने त्याला प्रत्त्युतर देण्यात आले आहे. गेल्या २ दिवसांपासून शिवराळ शिवतारे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. ठाण्यातील शिंदेशाही संपवायची आहे का? असा सवाल माजी खासदार आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे.

15:52 (IST) 13 Mar 2024
"तर अंत्यविधीच्या साहित्यावरही भाजपची जाहिरात.." काय म्हणाले रोहित पवार ?

नागपूर: भारतीय जनता पक्षाने (भाजप) खतांच्या पिशव्यांवर, जेनेरिक औषधांवर पक्षाची जाहिरात केली. या बाबतीत प्रकाशित बातमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर भाष्य केले. 

सविस्तर वाचा

15:24 (IST) 13 Mar 2024
अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा निर्णय

अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. वाचा सविस्तर माहिती

15:22 (IST) 13 Mar 2024
मेट्रोत वाढदिवस साजरा करायचा? ३५०० रुपये मोजा

नागपूर: शहरात चारही भागात मेट्रो सेवा सुरु असून मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रोने प्रवास करत आहे महामेट्रोच्या वतीने 'सेलिब्रेशन ऑन व्हील्स' उपक्रम राबवला जात आहे. महामेट्रोने नागरिकांकरिता आणखी एक निर्णय घेत सेलिब्रेशन ऑन व्हील्स उपक्रमांतर्गत रविवार दिवशी फक्त ३५००/- रुपये मध्ये एका तासाकरिता संपूर्ण मेट्रो ट्रेन बुक करू शकता.

सविस्तर वाचा

15:01 (IST) 13 Mar 2024
वनखात्याच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात वणवा

नागपूर : नागपूर वनखात्याच्या अखत्यारितील अंबाझरी जैवविविधता उद्यान गेल्या दोन दिवसांपासून आगीत धूमसत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास या उद्यानाला आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सहकार्याने ती विझवली, पण पुन्हा बुधवारी त्याचठिकाणी आगीचा भडका उडाल्याने या उद्यानाविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सविस्तर वाचा

14:59 (IST) 13 Mar 2024
रेल्वे स्थानकाची नावं बदलण्यापेक्षा तिथली परिस्थिती बदला; मनसेची टीका

महाराष्ट्र सरकारने मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाची ब्रिटिशकालीन नावे बदलली आहेत. यावर मनसेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले की, रेल्वे स्थानकाची नावं बदलण्याऐवजी त्या रेल्वे स्थानकाची रुपरेषा बदलली पाहिजे. लोकल प्रवाशांना काय समस्या आहेत, हे खासदारांनी पाहून घेतले पाहिजे.

14:55 (IST) 13 Mar 2024
अंधेरीतील अंबानी रुग्णालयाशेजारी परवडणाऱ्या दरातील सुसज्ज रुग्णालय उभे राहणार, ८५ वर्षे वयाच्या डाॅक्टरचा २५ वर्षांचा लढा यशस्वी!

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाच्या शेजारील भूखंड मिळूनही प्रत्यक्ष ताब्यासाठी एका ८५ वर्षे वयाच्या डॉक्टरने २५ वर्षे दिलेल्या लढ्याला यश आले आहे. परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारल्या जाणाऱ्या कर्करोग व बहुद्देशीय रुग्णालयाचा पायाभरणी समारंभ अलीकडे झाला. या रुग्णालयाचे व्यवस्थापन टाटा ट्रस्टच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या कार्किनोज हेल्थकेअरमार्फत सांभाळले जाणार आहे.

सविस्तर वाचा...

14:45 (IST) 13 Mar 2024
नाशिक, दिंडोरीत ५०० पेक्षा अधिक उमेदवार, सकल मराठा समाजाची तयारी

नाशिक : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ५०० पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे.

वाचा सविस्तर...

14:44 (IST) 13 Mar 2024
अखेर शिवसेनाच्या बेकायदेशीर कंटेनर शाखांना पालिकेच्या नोटीसा

भाईंदर : मिरा रोड व भाईंदर शहरात रस्त्याच्या कडेला अथवा पदपथावर उभारण्यात आलेल्या शिवसेनेच्या ( शिंदे गट) कंटेनर शाखेला अखेर महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. यात हे कंटेनर तात्काळ न हटावल्यास थेट कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

14:35 (IST) 13 Mar 2024
बुलढाणा : संपर्कप्रमुख खेडेकर, जिल्हाप्रमुख बुधवत तातडीने कारंजात; उद्धव ठाकरेंची घेतली भेट, बंदद्वार चर्चा

बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांचे ‘तिकीट फायनल’ झाल्याची चर्चाही पसरली आहे. उबाठा बरोबरच मित्र व शत्रू पक्षातही या भेटी बद्दल विविध तर्क लावण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

13:58 (IST) 13 Mar 2024
वसई-विरारमध्ये उघड्या गटाराचा धोका कायम, नालासोपाऱ्यात गटारात अडकून महिला जखमी

वसई : वसई विरार मधील विविध ठिकाणी अजूनही उघडी व तुटलेल्या अवस्थेतील गटारांची झाकणे आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे. नुकताच नालासोपारा येथील रहेमत नगर येथे एका महिलेचा पाय अडकून जखमी झाली आहे.

वाचा सविस्तर...

13:52 (IST) 13 Mar 2024
सौजन्यानं पाहण्याचा ठेका फक्त आम्हीच घेतला आहे का? अजित पवार गटाची शिंदे गटावर टीका

शिवतारेंना आवर घालावा अशी विनंती सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदेंना केली आहे. आमच्यासोबत भाजपा आणि शिवसेनेनंही बारामती मतदारसंघाकडे सौजन्यानं पाहावं. सौजन्यानं पाहण्याचा ठेका फक्त आम्हीच घेतला आहे का? अशी टीका अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केली आहे.

13:38 (IST) 13 Mar 2024
अकोला लोकसभा मतदारसंघात गठ्ठा मतपेढीवर लक्ष, कुणबी समाज केंद्रस्थानी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेला कुणबी समाज सध्या केंद्रस्थानी आहे. या गठ्ठा मतपेढीवर प्रमुख नेत्यांचे लक्ष असून ते आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.

सविस्तर वाचा...

13:17 (IST) 13 Mar 2024
नाथुराम हिंदू महासभाची घोषणा, संघभूमीतून निवडणूक….

महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप बाळासाहेब काळे हे स्वतः मैदानात उतरणार आहेत.

सविस्तर वाचा...

13:04 (IST) 13 Mar 2024
अकोला : भाजपचे बेरजेचे राजकारण, ‘उबाठा’ सेनेसह महायुतीतील मित्र पक्ष प्रहारला धक्का

अकोला : अकोला भाजपकडून बेरजेचे राजकारण केले जात आहे. अकोट तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उबाठा शिवसेनेसह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारला भाजपने मोठा धक्का दिला आहे.

सविस्तर वाचा...

13:04 (IST) 13 Mar 2024
संजय निरुपम यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट; राहुल गांधींना आणखी एक धक्का बसणार?

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाल्यानंतर इकडे महाराष्ट्रात आधी मिलिंद देवरा आणि त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात आली आहे. त्यावेळी राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी भाजपा नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार का? अशी चर्चा होत आहे.

13:00 (IST) 13 Mar 2024
नागपूर विद्यापीठात ‘रामजन्मभूमी न्यास’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव! अधिसभेच्या विषयपत्रिकेवरून टीका

अधिसभेच्या बैठकीमध्ये सदस्य डॉ. योगेश भुते यांनी राममंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त रामजन्मभूमी न्यासच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवल्याचे विषयपत्रिकेवरून समोर आले आहे.

सविस्तर वाचा...

12:59 (IST) 13 Mar 2024
रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर नियुक्तीची पत्रे, मध्य रेल्वेतील धक्कादायक प्रकार

मुंबई : देशभरात रोजगार मेळाव्यातून हजारो उमेदवारांना नियुक्ती देण्याचे शासकीय कार्यक्रम गाजत असताना प्रत्यक्षात अनेक अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी पात्र उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्ती देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात हा प्रकार घडला आहे.

सविस्तर वाचा...

12:59 (IST) 13 Mar 2024
सागरी किनारा मार्गावर पहिल्याच दिवशी १६ हजार वाहने, वरळीतून प्रवेश केवळ ५ वाजेपर्यंत, कोंडीमुळे निर्णय

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतिक्षित असा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल १६ हजारांहून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला.

सविस्तर वाचा..

12:59 (IST) 13 Mar 2024
आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठास सुवर्ण पदक

मुंबई : विद्यार्थ्यांसह शिक्षकांमधील संशोधनवृत्तीला बळ देण्यासाठी भारतीय विद्यापीठ संघ (एआययु) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवाचे ११ व १२ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करीत सर्वसाधारण सुवर्ण पदक प्राप्त करून स्पर्धेवर विजयी मोहर उमटविली. तसेच आरोग्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या गटात विद्यापीठाने प्रथम क्रमांक तर शेती गटात द्वितीय क्रमांक पटकावला.

12:55 (IST) 13 Mar 2024
जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज प्रशासन आक्रमक, जेसीबीसह तीन डंपर ताब्यात

जळगाव : जळगावसह यावल येथील तहसीलदारांच्या संयुक्तिक पथकाची एकाच दिवशी, एकाच वेळी शेळगाव बॅरेजजवळ अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणार्‍यांवर मोठी कारवाई करण्यात आली. पथकाला पाहून वाळूमाफिया अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळावरून जेसीबीसह वाळूने भरलेले तीन डंपर यावलच्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

वाचा सविस्तर...

12:55 (IST) 13 Mar 2024
“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा”, हे अभियान म्हणजे जुन्याच उपक्रमांना नवा मुलामा – शाळांची नाराजी

राज्यात शासनामार्फत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाबात ठाणे जिल्ह्यातील काही शाळांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा...

12:28 (IST) 13 Mar 2024
भाजपात जायचं असेल तर शरद पवारांना सांगून जाईल, एकनाथ खडसेंचं विधान

भाजपाचे माजी नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून ते पुन्हा एकदा भाजपात जातील, असे दावे अनेकदा करण्यात आले आहेत. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन हे याबद्दल नेहमीच वाच्यता करत असतात. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला भाजपामध्ये जेव्हा जायचं असेल तेव्हा शरद पवार यांना सांगून जाईल, असं विधान खडसे यांनी केलं आहे.

12:25 (IST) 13 Mar 2024
पुण्यात घामाच्या धारा

पुणे : राज्यभरात उन्हाचा पारा वाढला असताना शहरातही उन्हाचा चटका वाढला आहे. शहराचे सरासरी तापमान ३७.३ अंश सेल्सिअसवर गेले असून, लवळे येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

सविस्तर वाचा...

12:05 (IST) 13 Mar 2024
पिंपरी : पाणी काटकसरीने वापरा, महापालिकेचे गृहनिर्माण संस्थांना पत्र

पिंपरी : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतील गृहनिर्माण संस्थांमधून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा...

12:04 (IST) 13 Mar 2024
पिंपरी : मोशीतील कचऱ्याच्या ‘बायोमायनिंग’मुळे महापालिकेस २५ एकर जागा

पिंपरी : महापालिकेच्या वतीने मोशी कचरा भूमीतील बायोमायनिंग प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. आठ लाख चौरस मीटर जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंगचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अतिरिक्त १५ लाख चौरस मीटर कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार आहे.

सविस्तर वाचा...

11:54 (IST) 13 Mar 2024
माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचे अपघाती निधन, महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास करणे जीवावर बेतले

वसई: नालासोपारा नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचे बुधवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघाती निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असलेले श्याम पेंढारी यांच्या पत्नी जया पेंढारी या देखील वसई विरार महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत.

वाचा सविस्तर...

11:52 (IST) 13 Mar 2024
बुलढाणा : गुंतवणूक परिषदेत तब्बल ११५० कोटींचे सामंजस्य करार

बुलढाण्यात पार पडलेली जिल्हा गुंतवणूक परिषद फलदायी ठरली! या परिषदेत ४५ उद्योजकांसोबत १ हजार १५० कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

11:39 (IST) 13 Mar 2024
रावेर लोकसभेसाठी आपला पहिला क्रमांक; एकनाथ खडसे यांचा उमेदवारीसाठी दावा

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रावेरची जागा मिळण्याचे संकेत असून, माझ्यासह चार जण इच्छुक आहेत. पहिला क्रमांक आपलाच असल्यामुळे भाजपचा उमेदवार कुणीही असला, तरी पूर्ण ताकदीनिशी आम्हीच रावेरची जागा जिंकू, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला.

वाचा सविस्तर...

11:34 (IST) 13 Mar 2024
मुंबईतील १७ भूखंडांचा ई-लिलाव, म्हाडा आज निविदा प्रसिद्ध करणार

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या १७ भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, खेळाचे मैदान, रुग्णालय, मनोरंजन केंद्र अशा विविध वापरासाठी आरक्षित असलेल्या १७ भूखंडाच्या ई- लिलावासाठी बुधवारी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या भूखंडाच्या विक्रीतून मुंबई मंडळाला कोट्यवधी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

11:21 (IST) 13 Mar 2024
Video: वाघिणीला तहान लागली; मग तिने असे काही केले की…

माणसांना पाणी लवकर उपलब्ध होते, पण प्राण्यांना पानवठ्याचा शोध घेत तिथपर्यंत पोहचून मग आपली तहान भागवावी लागते.

सविस्तर वाचा...

11:21 (IST) 13 Mar 2024
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सेमिकंडक्टर सुविधांची पायाभरणी, विद्यापीठातून थेट प्रक्षेपण

भारताच्या दृष्टीला पुढे नेण्यासाठी १३ मार्च २०२४ रोजी गुजरात आणि आसाम राज्यांमध्ये तीन ठिकाणी सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी करणार आहेत.

सविस्तर वाचा...

11:20 (IST) 13 Mar 2024
पुणे : सिंहगड रस्त्यावर किरकटवाडीत अफूची शेती

पोलिसांच्या पथकाने १४ किलो अफूची बोंडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या बोडांची किंमत २८ हजार ७०० रुपये आहे.

सविस्तर वाचा...

11:20 (IST) 13 Mar 2024
केंद्राचा निधी मिळवण्यात उत्तर प्रदेशची आघाडी; राज्यातील विद्यापीठांना ५४० कोटी रुपयांचा निधी

राज्याला मिळालेल्या ५४० कोटी रुपयांच्या निधीतून राज्यातील चार विद्यापीठांना प्रत्येकी शंभर कोटी, तर सात विद्यापीठांना प्रत्येकी वीस कोटी रुपये मिळणार आहेत.

सविस्तर वाचा...

11:19 (IST) 13 Mar 2024
अलिबाग खाडीतील मोठ्या जहाजांची वाहतूक रोखा, मच्छीमार संघटनांची का केली मागणी? जाणून घ्या

अलिबाग आणि आक्षी- साखर दरम्यान असलेल्या खाडीतून होणारी मोठ्या जहाजांची वाहतूक रोखा अशी मागणी अलिबाग मच्छीमार सोसायटीच्या वतीने मेरीटाईम बोर्डाकडे करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

11:10 (IST) 13 Mar 2024
गडचिरोली : दुर्गम भागातील आदिवासींची हेळसांड केव्हा थांबणार ? बालिका अत्याचारप्रकरणी ढिसाळ आरोग्य व्यवस्था पुन्हा चर्चेत

गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेद्रांची निर्मिती करण्यात आली. परंतु या केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने येथील आदिवासींना उपचारासाठी वणवण भटकावे लागते. असाच दुर्दैवी प्रसंग एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावातील चार वर्षीय अत्याचार पिडीत बालिकेच्या पालकांवर ओढवला. अखेर त्या चिमुकलीला उपचारासाठी नागपूरला न्यावे लागले.

सविस्तर वाचा...

11:09 (IST) 13 Mar 2024
नागपूर : झटपट पैसे कमविण्याचे आमिष; युवकाची २६ लाखांची फसवणूक

नागपूर : इंस्टाग्रामवरील स्टॉक मॉर्केटमध्ये गुंतवणुकीतून झटपट पैसे कमविण्याच्या जाहिरातीला बळी पडलेल्या एका युवकाची केवळ एका महिन्यात २६ लाख ८५ हजार रुपयांनी फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांच्या टोळीने त्या युवकाला व्यवस्थितपणे जाळ्यात अडकवून पैसे उकळले.

सविस्तर वाचा...

11:09 (IST) 13 Mar 2024
राहुल गांधी यांची न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यात, गुरुवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा; काळाराम मंदिरास भेट नसल्याने कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेदरम्यान भेट देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भेट देऊन अभिषेक करणार आहेत. काँग्रेसला रामाचे काही वावडे नाही. यात्रेचा मार्ग वेगळा असल्याने गांधी हे काळाराम मंदिरात जाणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

वाचा सविस्तर...

11:08 (IST) 13 Mar 2024
वसई : चाळीस हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया, कचरा भूमीवरील समस्या सोडवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

वसई : कचरा भूमीवर पडून असलेल्या १५ लाख मॅट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. तीन महिन्यात पालिकेने सुमारे ४० हजार मॅट्रिक टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. वसई विरार शहरात दिवसेंदिवस निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

सविस्तर वाचा...

Mumbai Maharashtra News in Marathi

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह टुडे