Maharashtra Political News राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापू लागलेला असतानाच ओबीसी समाजही आरक्षणाच्या बाबतीत आक्रमक झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. छगन भुजबळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यात मनोज जरांगेंच्या सभांना मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पेच राज्य सरकारसमोर निर्माण झाल्याचं दिसत आहे.
Maharashtra News Live Updates: आरक्षणाचा मुद्दा तापला, राज्य सरकारसमोर मोठा पेच!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? यासंदर्भातील निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी, अर्थात २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
कोण कुठे जाऊन जुगार खेळतंय, कोण कुठे जाऊन काय करतंय याच्याशी महाराष्ट्राला काही घेणं देणं नाही, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. परंतु आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातल्या युवांचा, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा, राज्याच्या अस्मितेचा पूर्ण जुगार झाला आहे, त्यामुळे उगाच बिनकामाच्या गप्पा न मारता मुद्द्याचं_बोला हीच आज राज्याची मागणी आहे.
चंद्रपूर: जुनोनाच्या जंगलात काड्या आणण्यासाठी गेलेल्या स्कूल बसचा चालक मनोहर वाणी (५२) यांच्यावर वाघाने हल्ला केला.
मालेगाव: येथील रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.
पुणे: सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे पक्षचिन्ह कुणाचं? यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाने आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. या सुनावणीसाठी खुद्द शरद पवार निवडणूक आयोगासमोर उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.
टोळीने शुक्रवारी झालेल्या जरांगे पाटील यांच्या सांगली दौर्यावेळी मोठी हातसफाई केल्याचे दिसून आले होते.
भंडारा : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी भंडारा जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विविध संघटना आणि लाभार्थ्यांनी निवेदन देण्यासाठी वेळ मागितली होती. त्यांना वेळ देण्यातही आली होती. त्यासाठी सकाळपासून अनेक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लाभार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीस्थळी पोहोचले होते. मात्र कार्यक्रम संपताच मुख्यमंत्र्यांचा ताफा कुणालाही न भेटता निघून गेल्याने नागरिक संतापले आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्ग सहावर रास्ता रोको सुरू केले.
नाशिक: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आमच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडावे, या मागणीसाठी मराठवाड्यातील काही राजकीय पक्षांच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अकस्मात गंगापूर धरणावर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले.
नाशिक: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आमच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडावे, या मागणीसाठी मराठवाड्यातील काही राजकीय पक्षांच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अकस्मात गंगापूर धरणावर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले. धरण परिसरात परवानगीशिवाय प्रवेशास प्रतिबंध आहे.
जळगाव: तालुक्यातील शेळगाव येथील धरणात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा तोल गेल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघड झाली. याप्रकरणी नशिराबाद येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
अकोला : काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केल्याच्या २४ तासांच्या आत एका उपाध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय बोडखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिला. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नाराजी कायम असल्याचे दिसून येते.
आमच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झालेला असताना १८ दिवस होऊनही काही झालेलं नाही. आधीच दोन महिने गेले आहेत. सरकारपेक्षाही स्वत:ला कोणता अधिकारी वरचढ समजतोय हे समोर आलं पाहिजे - मनोज जरांगे पाटील
डाॅ. इंदूराणी जाखड या २०१६ च्या आयएएस तुकडीतील महाराष्ट्र संवर्गातील अधिकारी आहेत.
ही विकृत मानसिकता संपवायला हवी. इतकं फ्रस्ट्रेशन योग्य नाही. तुम्ही असे फोटो टाकून इतके वाईट आरोप करत आहात. हा राजकीय पातळी खाली नेण्याचाच प्रकार आहे - देवेंद्र फडणवीस
नागपूर : एकदिवसीय विश्वकपच्या अंतिम सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधीपक्षाने लक्ष्य केले आहे. मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ असतो, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
भंडारा : येथील चैतन्य मैदानावर आज दुपारी सुरू झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच अचानक प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंचापुढे गोंधळ घातला. शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ ठरत असल्याने निषेध व्यक्त करीत विनोद वंजारी मंचापुढे आले व ‘खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देण्यास सुरवात केली.
रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची रांग होती. त्यामुळे मुलीच्या वडिलांना परत येण्यास उशीर झाला.
मकाऊमध्ये त्या व्यक्तीने तीन तासांत साडेतीन कोटी रुपये उडवले. ते म्हणतात कुटुंबाबरोबर मकाऊमध्ये होतो. मग तुमचं कुटुंब चीनी आहे का? तुमच्याकडे इकडे इडी आहे, आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आहे. तिथून फोटो येत आहेत आमच्याकडे. माझ्याकडे आणखी २७ फोटो आणि पाच व्हिडीओ आहेत - संजय राऊत
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपण महायुतीकडून निवडणूक लढवणार आहे. यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.
मुंबई : कंपनीत ३१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली कंपनीच्या महिला अधिकाऱ्याविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कपड्यांच्या कंपनीच्या मालकाने केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फसवणुकीची रक्कम बँक खात्यातून काढण्यात आल्याचा आरोप आहे.
नागपूर: आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने (सीआयटीयू) २३ दिवसांचा संप यशस्वी केल्यावर गुरूदेव सेवाश्रम सभागृहात विजय मेळावा घेतला. याप्रसंगी विधानसभा अधिवेशनापूर्वी शासनाने आश्वासनानुसार शासन आदेश न काढल्यास पुन्हा संपाचा इशारा युनियनचे नेते राजेंद्र साठे यांनी दिला.
ते म्हणे.. फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय! - संजय राऊत
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे - चंद्रशेखर बावनकुळे
https://twitter.com/cbawankule/status/1726534157738897821?s=48&t=yN4NDAcqXYHcL_Rp6w09WQ
महाराष्ट्र पेटलेला आहे... आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा...ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है... - संजय राऊत
अकोला : अकोला-म्हैसांग मार्गावर आपातापानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचारी युवकाचा मृत्यू झाला. योगेश सुभाष गाडे (२४, रा. अनकवाडी) असे मृताचे नाव आहे.
गणेश पेठेतील बुरुड गल्लीमधील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली.
अकोला : दिवाळीची सुट्टी असल्याने सहलीला गेलेल्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरांग आंबेकर (२०) याचा पातूर घाटात दुचाकी घसरल्याने रविवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याने हेल्मेट परिधान केले होते. मात्र, छातीला दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.
भुरट्या चोरांनी तक्रारदार यांच्या हातामधील सोन्याची अंगठी, लाॅकेट, पाकिटमधील पैसे असा ३८ हजार रूपयांचा ऐवज काढून घेतला.
अकोला : काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस कोषाध्यक्ष, चिटणीसांसह तब्बल २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्वांना पदे देऊन खूश करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह
Maharashtra News Live Updates: मरोज जरांगेंच्या सभांना मराठा समाजाची मोठी गर्दी!