scorecardresearch

Maharashtra News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Maharashtra Breaking News Updates Today, 16 August 2022 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर!

Maharashtra News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह टुडे

Maharashtra Latest News Today : राज्यातील नव्या सरकारच्या खातेवाटपानंतर त्यासंदर्भात मोठी चर्चा पाहायला मिळाली. आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीची आणि त्यांच्या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे. सभापतींच्या निवडीआधी ही यादी मंजूर करून घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असताना विरोधकांकडून मागच्या सरकारमध्ये राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेचं भांडवल केलं जात आहे. तर दुसरीकडे विनायक मेटे यांच्या अपघातामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला जात असल्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जात आहे. त्यांच्या चालकाने पोलिसांच्या चौकशीत असमाधानकारक उत्तरं दिल्याचं देखील बोललं जात आहे.

Live Updates

Maharashtra Latest News Today : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!

22:05 (IST) 16 Aug 2022
गरवारे महाविद्यालय ते डेक्कन मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते दापोडी दरम्यान मेट्रोची चाचणी

मेट्रोची गरवारे महाविद्यालय ते डेक्कन मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्थानक दरम्यानची यशस्वी चाचणी सोमवारी घेण्यात आली. शहरातील उन्नत मेट्रो प्रकल्पाचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे. नव्या मार्गांवरील स्थानकांचे कामही तत्पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा

21:49 (IST) 16 Aug 2022
साडेचार महिन्यांच्या मुलासह पत्नीचा विहिरीत ढकलून खून ; शिरूर तालुक्यात सापडलेल्या मृतदेहांचे गूढ उकलले

शिरूर तालुक्यातील आण्णापूर येथे विहिरीत मृतावस्थेत सापडलेले पाच महिन्यांचे बालक आणि महिलेच्या मृतदेहांबाबतचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह स्वत:च्या साडेचार महिन्यांच्या मुलाचा वडिलांनीच विहिरीत ढकलून खून केल्याचे उघडकीस आले आहे. सविस्तर वाचा

20:18 (IST) 16 Aug 2022
विरोधकांना गजनीची लागण झाली आहे – देवेंद्र फडणवीस

राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी दिलेल्या सातपानी पत्रावरून जोरदार टीका केली. या पत्रातील मधले चार पानं हे आम्ही विरोधात असताना दिलेल्या पत्राचेच असून विरोधकांना गजनीची लागण झाली असल्याचे म्हटले.

सविस्तर वाचा

20:15 (IST) 16 Aug 2022
राज्यात होणार सामूहिक राष्ट्रगीताचे गायन

बुधवारी सकाळी ११ वाजता राज्यात सामूहिक राष्ट्रगीताचे गायन होणार असून नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभं राहून या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

सविस्तर वाचा –

20:03 (IST) 16 Aug 2022
“उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यानंतरही आदेश जारी केले” CM एकनाथ शिंदेंचा पत्रकार परिषदेत दावा, म्हणाले…

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले होते. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळानं घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. यावरून शिंदे सरकारकर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतरही घाई-गडबडीत अनेक निर्णय घेतले, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सविस्तर बातमी

19:43 (IST) 16 Aug 2022
रेल्वे प्रवासात विसरलेली बॅग  योग्य समन्वयातून प्रवाशाला परत

मुंबई-विशाखापट्टणम एक्स्प्रेसमधील प्रवासादरम्यान गाडीत विसरलेली पुण्यातचील प्रवाशाची बॅग रेल्वेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या योग्य समन्वयातून प्रवासाला परत मिळाली. महत्त्वाची कागदपत्र ठेवलेली आणि निवृत्ती वेतनासंदर्भातील फाईल असलेली ही बॅग पत मिळाल्यामुळे प्रवाशाने रेल्वे प्रवाशाचे आभार व्यक्त केले सविस्तर वाचा

19:32 (IST) 16 Aug 2022
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; गुराखी जखमी

ब्रम्हपुरी तालुक्यातील दुधवाही येथील शेतशिवरात वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मुखरू राऊत (६२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सविस्तर वाचा

19:21 (IST) 16 Aug 2022
अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशांसाठी आज अंतिम मुदत

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशांसाठी उद्या (१७ ऑगस्ट) अंतिम मुदत आहे. दुसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जेमतेम ५ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला असून, १८ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेतील तिसरी फेरी सुरू करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा

19:15 (IST) 16 Aug 2022
शेतकऱ्यांनो, सरकार आणि परमेश्वरावर विसंबून राहू नका – गडकरी

शेत पंपाच्या विजेसाठी सरकारवर, वीज मंडळावर विसंबून राहू नका. कारण, सरकार आणि परमेश्वर यांचे केव्हा आशीर्वाद मिळतील आणि केव्हा गायब होतील, याचा काही भरवसा नाही, असे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सविस्तर वाचा

19:06 (IST) 16 Aug 2022
“आमच्या पक्षात फूट पडली तेव्हा चिन्ह…”, आरपीआयचं उदाहरण देत शिवसेनेबाबत रामदास आठवलेंचं मोठं विधान

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि पक्षाच्या 'धनुष्यबाण' या चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर मोठं विधान केलंय. आठवलेंनी आरपीआय पक्षात फूट झाली त्याचं उदाहरण देत तेव्हा निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला हे सांगितलं. तसेच त्याप्रमाणे आजच्या स्थितीत शिवसेना पक्षाचं चिन्ह उद्धव ठाकरे गटाला मिळणार की एकनाथ शिंदे गटाला याबाबत आपलं मत व्यक्त केलं. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी…

18:51 (IST) 16 Aug 2022
ठाणे जिल्ह्यात उद्या ११ वाजता होणार समूह राष्ट्रगीत गायन ; उपक्रमात सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यात स्वराज्य महोत्सव  अंतर्गत उद्या सकाळी ११ वाजता  समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम होणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील खासगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा , महाविद्यालये, विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यात  सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. सविस्तर वाचा

18:47 (IST) 16 Aug 2022
Nitesh Rane Assault: नितेश राणे आणि समर्थकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी अन्य एका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे ( उमेद ) देवगड व्यवस्थापक शिवाजी पांडुरंग खरात यांनी केली आहे.

सविस्तर बातमी

18:32 (IST) 16 Aug 2022
भुलेश्वरमधील शंभर वर्षे जुनी जीर्ण इमारत पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील ; इमारत तीन आठवड्यांत रिकामी करण्याचे भाडेकरूंना आदेश

दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या भुलेश्वर परिसरातील शंभर वर्षांपूर्वीची मोडकळीस आलेली इमारत पाडण्यास उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला हिरवा कंदील दाखवला. तसेच इमारत तीन आठवड्यांत रिकामी करण्याचे आदेश न्यायालयाने इमारतीतील भाडेकरूंना दिले. सविस्तर वाचा

17:58 (IST) 16 Aug 2022
सत्तेची मस्ती डोक्यात गेली का? अजित पवारांचा शिंदे सरकारला खडा सवाल! संतोष बांगर यांनाही सुनावलं

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना डब्बे पुरवणाऱ्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. तर शिंदे गटाचे आणखी एक आमदार प्रकाश सुर्वे यांनी चितावणीखोर भाषण करत, शिवसैनिकांना ठोकून काढा, त्यांचे हात नाही तोडता आले तर तंगडी तोडा, असं विधान केलं आहे. या घडामोडींनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे का? असा सवालही अजित पवार यांनी यावेळी विचारला आहे. सविस्तर बातमी

17:57 (IST) 16 Aug 2022
“हे सरकार लोकशाहीच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं” अजित पवारांची जोरदार टीका!

उद्यापासून महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करत चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांनाही सुनावलं आहे. सविस्तर बातमी

17:44 (IST) 16 Aug 2022
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर भाजपाचा डोळा? मुंबई भाजपातर्फे वरळीत मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन

आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात भाजपाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे तेही जांबोरी मैदानात. एकेकाळी जांबोरी मैदान आणि दंहीहंडीचे मेगा आयोजन असं सचिन अहिर यांच्याबाबतीत एक समीकरण तयार झालं होतं. मुंबईतील सर्वात मोठी आणि विविध मोठ्या बक्षिसांसाठी सचिन अहिर यांनी आयोजित केलेला जांबोरी मैदानातला दहीहंडी उत्सव ओळखला जायचा. पण यावेळी हे मैदान आधी बुक करत भाजपाने बाजी मारली आहे.

सविस्तर वाचा…

17:34 (IST) 16 Aug 2022
कल्याण पल्याडच्या प्रवाशांचा विना ‘थांबा’ प्रवास ; बस थांबे नसल्याने ऊन, पाऊस झेलत बसची प्रतीक्षा

परिवहन सेवा नसलेल्या उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि राज्य परिवहन सेवेच्या बसचा काही अंशी फायदा होतो. मात्र या शहरांमध्ये बस थांबेच नसल्याने प्रवाशांना ऊन, पावसाचा सामना करत बसची प्रतीक्षा करावी लागते. सविस्तर वाचा

17:13 (IST) 16 Aug 2022
पुणे : संगणक अभियंत्याच्या कुटुंबीयांचे रेल्वे प्रवासात दागिने लंपास

रेल्वे प्रवासात दिल्लीहून पुण्यात स्थायिक होण्यासाठी आलेल्या संगणक अभियंत्याच्या कुटुंबीयांच्या पिशवीतून साडेनऊ लाख रुपयांचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली.जेकब दवसीया (वय ३६, मूळ रा. दिल्ली) यांनी या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा

17:07 (IST) 16 Aug 2022
भुमीगत वाहनतळ प्रकल्पामुळे गावदेवी मैदान चार वर्षांपासून बंद ;  लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुर

ठाणे स्थानक परिसरातील गावदेवी मैदानात भुमिगत वाहनतळ लवकरच खुले होणार असल्याचे दावे पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी, या वाहनतळावरील मैदान मात्र अद्याप पुर्ववत झालेले नाही. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील हे एकमेव मैदान असून ते गेले चार वर्षे भुमिगत वाहनतळाच्या कामामुळे बंद आहे. सविस्तर वाचा

17:00 (IST) 16 Aug 2022
मुंबई : भावाच्या नावाने न्यूझिलंडचे पारपत्र तयार करून प्रवास ; अखेर आरोपीला अटक

भावाच्या नावाने न्यूझिलंडचे पारपत्र मिळवून त्यावरून स्वतः बेकायदेशिररित्या प्रवास केल्याप्रकरणी ५१ वर्षीय व्यक्तीला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. आरोपीकडे स्वतःच्या नावाचे एक भारतीय पारपत्र होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा

16:54 (IST) 16 Aug 2022
पुणे : मुकुंदनगर जैन संघातर्फे शोभायात्रा

देशभक्तीपर गीते, स्केटिंग, सायकलिंग आणि ढोल-ताशांच्या गजरात मुकुंदनगर जैन संघाच्या वतीने शोभायात्रा काढून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाला अभिवादन करण्यात आले. मुकुंदनगर ते दादावाडी जैन टेंपल पर्यंत ही शोभायात्रा निघाली. 

सविस्तर वाचा

16:43 (IST) 16 Aug 2022
ठाणे : दहीहंडीला साहसी खेळाचा लवकरच दर्जा मिळेल ; खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती

दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळून या खेळाची प्रो कब्बडीच्या धर्तीवर स्पर्धा व्हावी तसेच प्रत्येक गोविंदांचा राज्य शासनाने विमा काढावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून या दोन्ही मागणीबाबत मुख्यमंत्री शिंदे हे लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

सविस्तर वाचा

16:31 (IST) 16 Aug 2022
ठाणे : महिला पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या

श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलीस नाईक अनिता वाव्हळ यांनी पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

सविस्तर वाचा

16:25 (IST) 16 Aug 2022
डोंबिवलीत विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या दोन महिलांची एक तासाच्या अंतराने फसवणूक

आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या दोन महिलांची दोन वेगळ्या वेळांमध्ये फसवणूक करुन दोन चोरट्यांनी महिलांची गळ्यातील सोन्याचा ऐवज, रोख असा एकूण एक लाखाचा ऐवज लुटून नेला आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेत या महिला आपल्या मुलांना सोडण्यासाठी आल्या होत्या.

सविस्तर वाचा

16:14 (IST) 16 Aug 2022
‘त्याने’ गावठी बॉम्‍ब गळ्यात बांधला, अन्… ; अमरावतीतील युवकाच्या आत्महत्येने खळबळ

एका युवकाने गळ्यात गावठी बॉम्‍ब बांधल्‍यानंतर त्याचा स्‍फोट घडवून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना मेळघाटातील धारणी पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील कळमखार येथे उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा

15:43 (IST) 16 Aug 2022
डोंबिवलीत दहीहंडी उत्सवांसाठी वर्दळीचे रस्ते बंद करण्यात येत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

शुक्रवारी दहीहंडी उत्सव असला तरी राजकीय मंडळींचा आशीर्वाद असलेल्या दहीहंडी उत्सव मंडळांनी बुधवार पासून रस्त्यावर मंडप उभारणीचे साहित्य आणून मंडप उभारणीस सुरुवात केली आहे. डोंबिवली पूर्वेत बाजीप्रभू चौकात मंडप उभारणीस सुरुवात झाली आहे.

सविस्तर वाचा

15:37 (IST) 16 Aug 2022
सहा तासांत पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस; कांदिवलीत सर्वाधिक पावसाची नोंद

मुंबईत मंगळवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सकाळी अवघ्या सहा तासांमध्ये पश्चिम उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.  सविस्तर वाचा

14:35 (IST) 16 Aug 2022
पुणे : फुकटात परदेशवारीच्या आमिषाने नारायणगावातील तरुणाला गंडा ; अनेकांची फसवणूक केल्याचा संशय

भेटवस्तू तसेच फुकटात परदेशवारीच्या आमिषाने एका पर्यटन कंपनीने नारायणगाव भागातील तरुणाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका कंपनीच्या संचालकांसह प्रतिनिधींच्या विरोधात नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

14:28 (IST) 16 Aug 2022
Anand Dave on Vande Mataram : ‘जन-गण-मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत घोषित करा

सरकारी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना 'हॅलो'ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणावं, असं विधान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात 'वंदे मातरम्' म्हणण्यावरून राजकीय वातावरण तापत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मुनगंटीवार यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. 'वंदे मातरम्'ऐवजी आम्ही 'जय बळीराजा' म्हणणार अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. 'वंदे मातरम्' म्हणण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना आता हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनीही या वादात उडी घेतली आहे. सविस्तर बातमी

14:10 (IST) 16 Aug 2022
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेनेच्या चिन्हाबाबतच्या एकनाथ शिंदे गटाविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णांकडून महत्त्वाचा निर्णय

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यानंतर महाविकासआघाडी कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. इतकंच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाकडे जाणार हाही प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. आता याबाबत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. आता शिंदे गटाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

सविस्तर बातमी…

14:08 (IST) 16 Aug 2022
दादा भुसेंसह शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या नाराजीची चर्चा, शंभुराजे देसाई म्हणाले, “खातेवाटपाचा…”

शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी खातेवाटप झालं. मात्र, खातेवाटपानंतर शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुसे यांच्यासह काही मंत्री नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केलीय. आता पत्रकारांनी विचारलं असता शिंदे गटातील मंत्री शंभुराजे देसाई यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) मुंबईत बोलत होते.

सविस्तर बातमी…

13:58 (IST) 16 Aug 2022
पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली ; १८ महिन्यातच उचलबांगडी, शेखर सिंह शहराचे नवे आयुक्त

पिंपरी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांची मंगळवारी (१६ ऑगस्ट) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. साताऱ्याचे बहुचर्चित माजी जिल्हाधिकारी शेखर सिंह हे शहराचे नवे आयुक्त असणार आहेत. अवघ्या १८ महिन्यांत पाटील यांची उलचबांगडी झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सविस्तर वाचा

13:42 (IST) 16 Aug 2022
पुणे : ध्वज संकलनातून तिरंग्याच्या अभिमानाचे जतन ; ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ ध्वज संकलन अभियान

‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ या अभियानातून स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी रस्त्यावर इतरत्र पडलेले ध्वज संकलित करत पुण्यातील ’कीर्तने अँड पंडित फर्म’ने मंगळवारी तिरंग्याचा अभिमान जपला. कर्वे रस्ता, पौड रस्ता, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता यासह शहराच्या विविध भागात मंगळवारी सकाळी ध्वज संकलन अभियान राबविण्यात आले.

सविस्तर वाचा

13:18 (IST) 16 Aug 2022
मुंबईत बेस्टसाठी ‘स्वतंत्र मार्गिके’चा विचार ; झटपट प्रवासासाठी पुन्हा एकदा ‘बीआरटीएस’चा पर्याय

सार्वजिनक वाहतूक सुरळीत आणि वेगाने व्हावी यासाठी मुंबईत पुन्हा एकदा बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमचा (बीआरटीएस) पर्याय समोर आला आहे. बेस्ट उपक्रमाने हा पर्याय निवडला असून त्यासाठी पश्चिम द्रुतगती मार्गाचा विचार सुरू आहे.

सविस्तर वाचा

13:11 (IST) 16 Aug 2022
नागपूर : हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्यास विरोध म्हणजे संविधानाला विरोध – मुनगंटीवार

हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. वंदे मातरमला विरोध करणे म्हणजे संविधानाला विरोध करण्यासारखे आहे, असे मत राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा

12:56 (IST) 16 Aug 2022
मुंबईत पाऊसधारा ; दुपारी २ पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने उसंत घेतली नाही. त्यामुळे मुंबईतील सखल भागांत पावसाचे पाणी साचले.

सविस्तर वाचा

12:56 (IST) 16 Aug 2022
Vinayak Mete Accident: मेटेंचा अपघात की घातपात? पत्नीने केली चौकशीची मागणी, म्हणाल्या “मलाही संशय…”

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचं अपघातात निधन झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवीन वळण मिळताना दिसत आहे. ३ ऑगस्टला विनायक मेटेंच्या कारचा बीड ते पुणे प्रवासादरम्यान दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा खळबळजनक दावा अण्णासाहेब वायकर या कार्यकर्त्याने केला आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी या कार्यकर्त्याशी संवाद साधला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर बातमी

12:55 (IST) 16 Aug 2022
कल्याण : मोहने येथे रिक्षा चालकाला तरुणांकडून बेदम मारहाण

कल्याण पश्चिमेतील मोहने येथील रिक्षा वाहन तळांवर तीन जणांच्या टोळक्याने एका रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केली. या रिक्षा चालकाला मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा

12:54 (IST) 16 Aug 2022
मुंबई : जिजामाता नगर वसतिगृहाच्या कामाला मुहूर्त मिळेना

‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाने मुला-मुलींसाठी जिजामाता नगर येथील १,८२१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबई मंडळाला फेब्रुवारीपासून आजतागायत वसतिगृह बांधण्याच्या कामासाठी मुहूर्त मिळालेला नाही.

सविस्तर वाचा

11:55 (IST) 16 Aug 2022
Supriya Sule : “बायको जेवढी फुगत नसेल..,” सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी

मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला असली तरी कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याच मुद्द्याला घेऊन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टप्पणी केली आहे. घरातील बायको एवढी रुसत नसेल तेवढे हे मंत्री रुसत आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. ”टीव्ही ९ मराठी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. वाचा सविस्तर

11:25 (IST) 16 Aug 2022
Vinayak Car Mete Accident : मेटेंच्या अपघातामागचं गूढ वाढलं, कार्यकर्त्याच्या ‘या’ दाव्याची चर्चा!

मेटेंच्या अपघातामागचं गूढ वाढलं, कार्यकर्त्याच्या 'या' दाव्याची चर्चा!

https://www.loksatta.com/maharashtra/vinayak-mete-car-accident-suspicious-vehicle-was-chasing-claims-shiv-sangram-workers-pmw-88-3073624/

11:21 (IST) 16 Aug 2022
Ambani Family Threat: मुकेश अंबानींच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, दोन तासात आठ वेळा फोन

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दक्षिण मुंबईतील ज्वेलरला पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू भौमिक असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याने आठ वेळा रुग्णालयात फोन करुन मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारु अशी धमकी दिली. फोन करताना त्याने आपलं नाव ‘अफजल’ असल्याचं सांगितलं होतं.

सविस्तर बातमी

11:20 (IST) 16 Aug 2022
FIFA suspends AIFF: ‘फिफा’चा भारताला मोठा धक्का, फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई

FIFA suspends All India Football Federation: जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) भारताला मोठा धक्का दिला असून फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. भारतीय फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप वाढला असल्याने तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचं फिफाने सांगितलं आहे. या कारवाईमुळे भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात नियोजित करण्यात आलेला महिला खेळाडूंचा ‘अंडर १७ वर्ल्ड कप’ रद्द झाला आहे.

सविस्तर बातमी

11:18 (IST) 16 Aug 2022
Mungantiwar on Awhad: आव्हाडांना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले “हा दोष आपल्या…”

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं, असा आदेश दिल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, असा इशारा देत कोणी काय खावं, काय घालावं, काय बोलावं हे तुम्ही ठरवणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. आम्ही तसं म्हटलं नाही, तर जेलमध्ये टाकणार का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला मुनगंटीवारांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी

Maharashtra News Live Updates 16 August

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह टुडे

महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एकाच क्लिकवर!

ताज्या बातम्या