Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Update: लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आलेल्या असताना महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत. त्याचवेळी विधानसबा निवडणुकांसाठीची रणनीती सर्वपक्षांकडून आखली जाऊ लागली आहे. दुसरीकडे मनुस्मृतीविरोधातील आंदोलनादरम्यान घडलेल्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडांनी जाहीर माफी मागितल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत. सत्ताधारी गट आव्हाडांना लक्ष्य करत असताना छगन भुजबळांनी मात्र आव्हाडांची बाजू घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारी येथे ध्यानधारणेला सुरुवात केल्यापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातूनही त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Marathi News Updates 31 May 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा!
१९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटामधील आरोपी समीर शिंगोरा यांची भागीदारी अस्लेले हे हॉटेल आहे. नऊ वर्षे शिक्षा भोगून ते बाहेर आले आहेत.
नालेसफाईच्या कामाचा आजपर्यंतचा आढावा घेता हे काम अजूनही कूर्मगतीने सुरू आहे. जून महिना उजाडत आला तरी नालेसफाईचे काम गाळातच अडकले आहे.
मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष ‘बी.ए.’च्या सहाव्या सत्र परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला.
पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी एमएमआरडीएने सर्व कंत्राटदारांना पावसाळ्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
पुणे अपघात प्रकरणील अल्पवयीन आरोपीच्या चौकशीची परवानगी पुणे पोलिसांनी देण्यात आली आहे. त्यानुसार उद्या पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहे.
४३ परीक्षांवर मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आलेल्या ‘जम्बो ब्लॉक’चा कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली.
सातबारा पत्रकी नाव नोंद करून दाखला देण्यासाठी खासगी व्यक्ती रणजीत पाटील याने मंडल अधिकारी अभिजीत पवार यांच्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली.
राजेश सलगरकर याला शेतकऱ्यांकडून गाळ काढून शेतात टाकण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच घेताना २२ मे रोजी पकडले होते.
रिक्षा पासिंग करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रूपये इतका दंड आकारण्यास परिवहन कार्यालयाने सुरुवात केली आहे.
२६ जूनपर्यंत दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयात उत्तर सादर करायचे आहे.
भारत झुंजारेविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागरेश्वर अभयारण्यामध्ये २२ मे रोजी बौध्द पौर्णिमेच्या रात्री आठ पाणवठ्यावर प्राणीगणना करण्यात आली.
आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून सर्व विधानसभा मतदारसंघात एकूण १५५ मतमोजणीच्या फेर्या होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
हमारा राजा संसारका पहला ध्यानी है, जौ ध्यान के चारों रूप एकसाध साध रहा है - सुषमा अंधारेंचं खोचक ट्वीट!
https://twitter.com/andharesushama/status/1796500684407447916
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील शिवकालीन पुरातन दागिने गहाळ झाल्याचे मंदिर समितीने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले.
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्या वर्षी क्रमांक 1 वर ! एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल 30 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांत : ₹ 1,18,422 कोटी 2023-24 या आर्थिक वर्षांत : ₹ 1,25,101 कोटी या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो - देवेंद्र फडणवीस</p>
नागपूर: उमरेड तालुक्यातील कुही पोलीस ठाणे हद्दीतील एक कुटुंब, नातेवाईकांसह आंबे खाण्यासाठी एका शेतात गेले. पण झाडाला आंबे नसल्याने कुटुंबाने शेजारील मटकाझरी तलावाशेजारी डब्बा खाण्यासाठी गेले. तलावातील पाणी पाहून काहींना पोहण्याचा मोह झाला. ते तलावात उतरले पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला.
पनवेल : पुणे येथील अपघात प्रकरणानंतर सर्वत्र लेडीज सर्व्हीसबारची झाडाझडती घेण्याचे काम पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू झाले आहे. परंतू अनेक दिवस उलटले तरी पनवेलमधील ऑक्रेस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालविणाऱ्यांकडे सरकारी यंत्रणेने लक्ष्य केंद्रीत केले नव्हते.
नागपूर : राजधानी दिल्लीने दोन दिवसांपूर्वी तापमानाने पन्नाशी ओलांडत सर्वांना धक्का दिला. त्यानंतर आता नागपूर शहरातही तापमानाने पन्नाशी ओलांडली. शहराचे तापमान ५६ अंश सेल्सिअसवर गेल्याची माहिती समाजमाध्यमावर पसरली आणि नागपुरात नागरिकांमध्ये खळबळ माजली.
मुंबई : मध्य रेल्वेने फलाटाच्या विस्ताराची कामे हाती घेण्यासाठी ३० मे रोजी मध्यरात्रीपासून ६३ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. या जम्बो ब्लॉक काळात ९०० हून अधिक लोकल गाड्या रद्द होणार आहेत.
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
दक्षिण मुंबईत अर्ध्या तासापासून वीज पुरवठा खंडित. मंत्र्यांच्या बंगल्यातही बत्ती गुल!
पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे खेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांसोबत घनिष्ठ राजकीय संबंध असून ते त्यांच्या प्रभावाखाली काम करत आहेत, असा आरोप खेडचे प्रांताधिकारी तथा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी करत मतमोजणीपूर्वी डॉ. दिवसे यांची बदली करावी.
बुलढाणा : तगडा पोलीस बंदोबस्त, एकमेकांसमोर उभे ठाकलेले दोन गट, दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमार, अशा ताणतणावात मलकापूर बाजार समितीच्या सभापती विरुद्धचा अविश्वास ठराव आज बहुमताने पारित झाला.
कल्याण : शासनाची परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील तीन शाळा अनधिकृत म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाने घोषित केल्या आहेत. या तीन शाळा टिटवाळा भागात आहेत. या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत.
कल्याण : कल्याण शहरातील वाहन कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने प्रवासी हैराण आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत कल्याण पूर्व, पश्चिमेतील बहुतांशी रस्ते वाहन कोंडीत अडकत असल्याने यामध्ये कामावरून परतणाऱ्या नोकरदारांचे सर्वाधिक हाल होत आहेत.
नेहमी रिक्षाची वाट पाहत उभे असणारे प्रवासी आज हे चित्र बदललेले होते. रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले.
पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात शुक्रवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना २०१३ मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर झाले आहेत.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील फलाटांची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने गुरुवारी मध्यरात्रीपासून घेतलेल्या जम्बो ब्लॉकमुळे शुक्रवारी प्रवाशांचे हाल झाले. मात्र मुंबईतील रुग्णालयांमधील रुग्ण सेवेवर फारसा परिणाम जाणवलेला नाही.
ठाणे : मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तृतिकरणाचे काम हाती घेतले आहे. तसेच ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४
Marathi News Live Updates 31 May 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह सामाजिक-आर्थिक घटना जाणून घ्या एका क्लिकवर!