scorecardresearch

Maharashtra News : “अशोक चव्हाणांनी आमच्या पक्षात यावं”, NDA तील ‘या’ पक्षाने दिली थेट ऑफर

Mumbai Breaking News Update, 12 February 2024 : महाराष्ट्रातील राजकीय, गुन्हेगारी, हवामनाच्या बातम्या वाचा एका क्लिक

Ashok Chavan Resgination Updates
अशोक चव्हाणांचा राजीनामा (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra Politics Today : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची घडी, लोकप्रतिनिधींवरील हल्ले आणि हत्यांमुळे विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. तसंच, सत्ताधाऱ्यांकडून जातीय आणि धार्मिक राजकारण केलं जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. तसंच, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले असून आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे. तर, सरकारने काढलेल्या अधिसूचनेचा कायदा बनवण्यासाठी राज्यात लवकरच विशेष अधिवेशन घेतले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते आता कोणत्या पक्षात जातात हे पाहावं लागणार आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, हवामान अंदाज याबाबतचे वृत्त पाहुयात.

Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
Congress NCP Meeting sharad Pawar
VIDEO : चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावेळी काँग्रेस नेत्यांची शरद पवारांबरोबर खलबतं, मविआच्या गोटात चाललंय काय? नाना पटोले म्हणाले…
Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress in Marathi
Ashok Chavan Resigned: “अशोक चव्हाण काल संध्याकाळी म्हणाले होते की…”, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितल्या रविवारच्या घडामोडी!
Ashok Chavan
अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली? जुन्या सहकाऱ्याने सांगितलं कारण; या मोठ्या नेत्यावर फोडलं खापर
Live Updates

Maharashtra News Today 12 February 2024 : महाराष्ट्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

18:34 (IST) 12 Feb 2024
मुंबई : साकीनाका हत्या प्रकरणातील आरोपींना सहा तासांत अटक

मुंबई : दुचाकीचा धक्का लागल्यामुळे जाब विचारला असता तिघांनी २२ वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना साकीनाका येथे घडली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी तपास करून सहा तासांत आरोपींना अटक केली.

सविस्तर वाचा…

18:13 (IST) 12 Feb 2024
जनतेला विश्वासात घेतल्याविना कुठलेही पाऊल नाही – आ. डॉ. विश्वजित कदम

सांगली : व्यक्तीगत राजकीय जीवनात पलूस-कडेगाव मतदारसंघातील मतदारांना विश्‍वासात घेतल्याशिवाय मी कुठलेही पाऊल टाकणार नाही. मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नसून मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत आहे, असा खुलासा माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी सोमवारी दुपारी केला.

18:03 (IST) 12 Feb 2024
“अशोक चव्हाणांनी आमच्या पक्षात यावं”, NDA तील ‘या’ पक्षाने दिली थेट ऑफर

अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षात मी त्यांचं स्वागत करेन. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांच्या पक्षात तुम्ही यावं – रामदास आठवले</p>

17:59 (IST) 12 Feb 2024
ठाणे : एअर गनने दहशत माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल, अ‍ॅमेझॉन कंपनीच्या संकेतस्थळावरून विकत घेतली होती गन

ठाणे : भिवंडी येथील ठाणगेआळी भागात एअर गनने (बनावट बंदूक) परिसरात दहशत माजविल्याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुषार खारेकर (२४), कृष्णा चव्हाण (२९) आणि विशाल भोईर (२८) या तिघांना ठाणे पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा…

17:22 (IST) 12 Feb 2024
डोंबिवलीत ओला चालकाला प्रवाशाची मारहाण

डोंबिवली – भाडे देण्याच्या वादातून रविवारी रात्री येथील एमआयडीसीतील विको नाका भागात एका ओला कार चालकाला एका प्रवाशाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. सुनीलकुमार राजदेव यादेव (४५) असे ओला कार चालकाचे नाव आहे. तो दावडी गावात राहतो. रफिक शेख असे प्रवाशाचे नाव आहे. तो सोनारपाडा भागात राहतो.

सविस्तर वाचा…

17:21 (IST) 12 Feb 2024
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी वाहतूक ब्लॉक

मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबईवाहिनीवर साखळी क्रमांक कि.मी १५.७५० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हाती घेणार आहे. या कामादरम्यान मंगळवारी द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.

सविस्तर वाचा…

17:21 (IST) 12 Feb 2024
मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई : नवी मुंबईतील सिवूड्स येथे मनपाच्या स्थापत्य विभागाच्या कामाच्या आढाव्यादरम्यान कनिष्ठ अभियंत्याला अर्वाच्च शिवीगाळ करणे, अरेरावीचे बोलणे मनसे अध्यक्ष गजानन काळे यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सविस्तर वाचा…

17:20 (IST) 12 Feb 2024
नामांकित खाद्य पदार्थांच्या वेष्टनावर खाडाखोड करून विदेशात विक्री, अन्न औषध प्रशासनाची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई लगत आलेल्या एमआयडीसी भागातील एका कंपनी मार्फत विदेशात खाद्यमाल पाठवला जातो. मात्र हे करत असताना लिहिण्यात आलेल्या कालमर्यादा खोडण्यात येत होत्या, अशी माहिती समोर येताच नवी मुंबई मनसेच्या सहकार सेनेने ही बाब अन्न आणि औषध प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सदर प्रशासनाने या कंपनीवर धाड टाकली असता सहकार सेनेने केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

सविस्तर वाचा…

17:19 (IST) 12 Feb 2024
कल्याणमध्ये भव्य सीटी पार्क, गौरीपाडा येथे मनोरंजन, विरंगुळ्याचे प्रशस्त ठिकाण

कल्याण – कल्याणमधील गौरीपाडा येथील एक लाख २१ हजार ६०० चौरस मीटर जागेत कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाने सीटी पार्क विकसित केले आहे. मनोरंजन, विरंगुळ्याचे प्रशस्त ठिकाण यानिमित्ताने कल्याण शहराच्या वेशीवर उपलब्ध झाले आहे. मनोरंजनासाठी फिरायला कुठे जायाचे ही कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांची अडचण सीटी पार्कमुळे दूर झा्ली आहे.

सविस्तर वाचा…

17:18 (IST) 12 Feb 2024
“अफवांवर विश्वास ठेवू नका, आम्ही काँग्रेसमध्येच…” आमदाराचा खुलासा

चंद्रपूर: माझ्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार काँग्रेसशी निष्ठावान आहेत. आम्ही काँग्रेस सोबत राहू. जिल्ह्यात लोकसभा तथा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला वातावरण अतिशय पोषक आहे. आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावान सैनिक आहोत, अफवांवर विश्वास ठेवू नका, आम्ही काँग्रेसमध्येच आहोत, असे मत राजुराचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

वाचा सविस्तर…

17:05 (IST) 12 Feb 2024
अशोक चव्‍हाण हे भाजपाच्‍या ‘ब्‍लॅकमेलिंग’चे बळी, काँग्रेसच्‍या नेत्‍या यशोमती ठाकूर यांचा आरोप

अमरावती : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ‘ब्लॅकमेलिंग’ करून भाजपाने फोडल्‍याचा आरोप केला आहे.

वाचा सविस्तर…

16:53 (IST) 12 Feb 2024
“भविष्यात भाजपाच्या अध्यक्षपदी…”, अशोक चव्हणांच्या राजीनाम्यावरून ठाकरेंचा टोला

आता काँग्रेसव्याप्त भाजपा असं म्हणावं लागेल. भविष्यात भाजपाचा अध्यक्ष काँग्रेसची एखादी व्यक्ती असणार. तुम्ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही, मतदारांसोबत केली आहे.

16:47 (IST) 12 Feb 2024
मुंबई : कुटुंबातील चौघांना अन्नातून गुंगीचे औषध देऊन ५० लाखांची लूट, दोन नोकरांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : खार येथील एका कुटुंबात काम करणाऱ्या दोन नोकरांनी जेवणातून गुंगीचे औषध मिसळून घरातील ५० लाख रुपयांच्या मौलवान दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

सविस्तर वाचा…

16:38 (IST) 12 Feb 2024
भाजपाकडून दबावतंत्र सुरू आहे – माणिकराव ठाकरे

अशोकराव चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाणसुद्धा मुख्यमंत्री होते. कुठल्याही पस्थितीत काँग्रेसला विजय मिळवून देणं आमचं काम आहे. अधिक उत्साहाने काँग्रेस जोमाने पुढे जाईल, अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडणं हे दुर्दैवी आहे. भाजपाचं दबावतंत्र सुरू आहे. ज्या पक्षाचं देशाच्या चळवळीत काही योगदान नाही, देशाचं संविधान त्यांना मान्य नाहीत, विकासात्मक विचारावर मतदान होण्याची क्षमता नाही, अशोक चव्हाण यांनी असा निर्णय घेणं अंत्यत दुर्दैवी असून, कोणताही कार्यकर्ता त्यांच्यासोबत जाणार नसल्याची माहिती काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली.

16:36 (IST) 12 Feb 2024
…तर अशोक चव्हाणांचं स्वागतच असेल, संजय गायकवाडांची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण राजीनामा देतील अशी अनेक वर्षांपासून ही चर्चा होती, तसे प्रयत्नही सुरू होते. त्यांनी आज पक्ष पदाचा आणि आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिल्याचं पाहिलं. जर ते भाजप शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांच्यासोबतच्या काही सहकाऱ्यांचे नियोजन असेल तर त्यांचेही स्वागत आहे – संजय गायकवाड, आमदार, शिंदे गट

16:28 (IST) 12 Feb 2024
“…म्हणून मी राजीनामा दिला”, अशोक चव्हाणांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचा निर्णय कधी आणि का घेतला?

Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांनंतर अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. तसेच काही वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की, अशोक चव्हाण हे १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील. तसेच भाजपा अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं असताना चव्हाण यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येत या सर्व अफवांचं खंडण केलं, तसेच पक्ष सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिलं.

सविस्तर वाचा…

16:13 (IST) 12 Feb 2024
नागपूरच्या महिला पोलीस कबड्डीपटूंचा नेपाळमध्ये ‘डंका’

नागपूर : नेपाळमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय खुल्या कबड्डी स्पर्धेत नागपूर शहर पोलीस दलातील महिला संघाने सहभाग घेत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या नागपूर पोलीस महिला संघाचे नेतृत्व पोलीस कर्मचारी अनिता रेडी आणि अलका ठेंगरे यांनी केले.

सविस्तर वाचा…

16:02 (IST) 12 Feb 2024
“राजीनामा धक्कादायक! चव्हाणांच्या मागे चौकशीचा फेरा पण नेमकं…”, विजय वडेट्टीवार म्हणाले…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात एकदा नव्हेतर दोनदा होतो. त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

15:54 (IST) 12 Feb 2024
“काँग्रेस पक्ष जनतेकडे न्याय मागायला जाणार”, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

काँग्रेस पक्ष जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे. हे कशामुळे घडतंय हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. भाजपाला निवडणुकीला सामोरे जाण्याचं धाडस नाही. त्यामुळे फाटाफूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यांना मतदान करणारे मतदार आणि सर्वसामान्य जनता भाजपाबरोबर जाणार नाही. निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर चित्र समोर येईल. अशोक चव्हाणांच्या या निर्णयावर मी खंत व्यक्त करतो.

15:45 (IST) 12 Feb 2024
पुणे जिल्ह्यातील तिसऱ्या महापालिकेबाबत अजित पवार यांची घोषणा : म्हणाले, ‘ नवीन महानगरपालिका करता…’

पुणे : शहरानजीकच्या गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक आहे असे मत अजित पवार यांनी मांडले. तसेच पुण्यात नवीन महानगरपालिका विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

15:31 (IST) 12 Feb 2024
VIDEO : ताडोबात दोन वाघांमध्ये युद्धाचा थरार…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आज सोमवारची सकाळ पर्यटकांसाठी मोठी मेजवानी देणारी ठरली.

सविस्तर वाचा…

15:28 (IST) 12 Feb 2024
काँग्रेसला पुन्हा धक्का! अशोक चव्हाणांनंतर आणखी एका माजी आमदाराचा राजीनामा

अशोक चव्हाणांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यानंतर लागलीच विधानपरिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही राजीनामा दिला.

15:27 (IST) 12 Feb 2024
वीजदर सवलतीवर मर्यादा, न्यायालयात याचिका…

नागपूर: वीज दरामधील मासिक सवलत ४० लाख रुपयांपर्यंत मर्यादित केली गेल्यामुळे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन व सहा वस्त्रोद्योग कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. हा निर्णय अवैध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

15:26 (IST) 12 Feb 2024
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या, वाहतूक पोलीस वसुलीत मग्न अन् नागरिक…

नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात अधिवेशन काळ, मोर्चा, सामाजिक आंदोलन किंवा राजकीय आंदोलनादरम्यान कितीही पोलीस बंदोबस्त किंवा पोलिसांचे नियोजन असल्यानंतरही शहरात हमखास वाहतूक कोंडी निर्माण होते.

वाचा सविस्तर…

15:09 (IST) 12 Feb 2024
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांची खलबतं

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांची खलबतं, बाळासाहेब थोरातांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट

https://twitter.com/ANI/status/1756975655860818160

15:08 (IST) 12 Feb 2024
“मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत…”, राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्याचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांना भेटून दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केले नाही. कोणाबद्दल तक्रार करायची नाही, व्यक्तीगत भावना नाही, पुढची राजकीय भावना काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. पुढची राजकीय दिशा ठरवलेली नाही. मला काही अवधी लागेल. दोन दिवसांत मी माझ्या राजकीय दिशेाबत माहिती देईन – अशोक चव्हाण</p>

15:03 (IST) 12 Feb 2024
नागपूरच्या ‘या’ नामांकित हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला केली गुन्हा रद्द करण्याची विनवणी, वाचा काय आहे प्रकरण

प्रशिक्षकाने टँकमध्ये उडी मारत पाण्याखाली पाहताच धोपटे हे बुडालेले दिसले. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

सविस्तर वाचा…

15:02 (IST) 12 Feb 2024
सोन्याच्या दरात मोठी घसरण, हे आहेत आजचे दर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी २ फेब्रुवारीला नागपुरात सोन्याचे दर ६३ हजार ५०० रुपये नोंदवले गेले होते.

सविस्तर वाचा…

14:59 (IST) 12 Feb 2024
ताडोबा ऑनलाईन बुकिंग घोटाळ्यातील आरोपी ठाकूर बंधूना सर्वोच्च न्यायालयाचाही दणका, अटकपूर्व जामिन फेटाळला…

नागपूर : ताडोबा जंगल सफारीसाठी ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली ताडोबा प्रशासनाची १२ कोटी १५ लाखांची फसवणूक केलेल्या अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन्ही भावंडांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

वाचा सविस्तर…

14:55 (IST) 12 Feb 2024
निष्ठावंत काँग्रेसजनांनी ‘ हात ‘ सोडला

१९८५ साली अशोक चव्हाण युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आले. काँग्रेस पक्षाशी त्यांचा चार दशके संबंध राहिला. वयाच्या पासष्टीनंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचा ‘हात’ सोडून देत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

वाचा सविस्तर….

14:43 (IST) 12 Feb 2024
खळबळजनक! जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोली : येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय शिखरदीप बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वाचा सविस्तर…

14:36 (IST) 12 Feb 2024
प्रेयसीचे फिल्मी स्टाईल अपहरण, प्रियकराने घरात डांबले; आईवडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

नागपूर : फेसबुकवरून ओळखी झालेल्या युवकाने १६ वर्षीय मुलीचे घरातून अपहरण केले. तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवले. तिची सोडवणूक करण्यासाठी घरी आलेल्या तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीयूष करण निलपाल (२१, लष्करीबाग, पाचपावली) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

वाचा सविस्तर…

13:52 (IST) 12 Feb 2024
राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांच्या सोशल मीडिया खात्यावरील माहितीत बदल

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती आणि काँग्रेस कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष होते. ही माहिती त्यांच्या प्रोफाईलला जोडण्यात आली होती. परंतु, आता काँग्रेसचा राजीनामा दिल्याने त्यांनी काँग्रेसचा उल्लेख काढला आहे.

13:37 (IST) 12 Feb 2024
आस्था एक्स्प्रेसवर नंदुरबारजवळ दगडफेक ?

नंदुरबार : सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्स्प्रेसवर रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची तक्रार काही प्रवाश्यांनी केली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 12 Feb 2024
मोठी बातमी! अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम, सदस्यत्वाचा दिला राजीनामा

12:57 (IST) 12 Feb 2024
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “माझ्याकडे दोन पेन.. शाई संपते”

नागपूर : शिवसेनेशी गद्दरी करून भाजपच्या मदतीने संपूर्ण पक्ष आणि चिन्ह पळवणारे एकनाथ शिंदे कायम उद्धव ठाकरेंवर टीका करीत असतात. त्याला ठाकरे गटाकडून प्रतिउत्तर दिले जाते. शिंदे विरूद्ध ठाकरे वाद हा मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये रविवारी झालेल्या मेळाव्यात ठाकरे यांना लक्ष्य केले.

वाचा सविस्तर…

12:55 (IST) 12 Feb 2024
“राहुल गांधींवर कारवाई करणार,” हंसराज अहीर यांची माहिती; म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी ओबीसी…”

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत, असे खोटे व असत्य आरोप करणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली.

वाचा सविस्तर…

12:53 (IST) 12 Feb 2024
“काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात”, देवेंद्र फडणवीसांचा रोख नक्की कोणावर?

काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेस पक्ष वाटचाल करतोय त्यातून जनतेचे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, अशा लोकांची गदमरण होत आहे. जनतेचे लोक भाजपात प्रवेश करत आहेत. त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भाजपात येतील, हा मला विश्वास आहे. आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की आगे आगे देखिए होता है क्या – देवेंद्र फडणवीस</p>

12:48 (IST) 12 Feb 2024
वाशिम : धावत्या ट्रकचे टायर निखळले अन् रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्यांना धडकले; एकाचा मृत्यू, एक जखमी

वाशिम : मृत्यू कोणाला कुठे गाठेल, याचा काही नेम नाही. भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या. मात्र, ट्रकचे टायर निखळून ते रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली आहे.

सविस्तर वाचा…

12:44 (IST) 12 Feb 2024
काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपात जाहीर प्रवेश

काँग्रेसचे दोन माजी नगरसेवक जगदीश आण्णा कुट्टी आणि राजेंद्र दत्तात्रय नरवणकर यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली.

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1756939112383123730

12:11 (IST) 12 Feb 2024
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप दक्ष, विदर्भातील पाच मतदारसंघांवर अमित शाहांचे लक्ष! तयारीला वेग

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीला जोर आला असून पश्चिम विदर्भातील मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह १५ फेब्रुवारीला अकोला शहरात डेरेदाखल दाखल होणार आहेत. भाजपसह शिंदे गटाचे खासदार असलेल्या पाच मतदारसंघाचा ते आढावा घेणार असल्याची माहिती आहे.

वाचा सविस्तर…

12:05 (IST) 12 Feb 2024
वर्धा : कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात पावसाचे आगमन, खुर्च्यांची छत्री करीत श्रोत्यांचे पलायन; पाच हजार खुर्च्या गायब

वर्धा : प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांना बघण्यास व ऐकण्यास वर्धेकर रसिकांनी चांगलीच गर्दी केली होती. पण पावसाने या उत्साहावार विरजण टाकल्याने खेर यांच्या गायनाची काही खैर राहली नाही. शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे स्वावलंबी शाळेच्या मैदानावर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

वाचा सविस्तर…

12:05 (IST) 12 Feb 2024
पुणे : निवासी डॉक्टरांच्या लढ्याला यश! सरकारने उचलली तातडीने पावले

पुणे : वैद्यकीयचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृहाची सुविधा पुरेशी नसल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) नुकताच संप पुकारला होता. त्यावेळी मार्डच्या शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चर्चा केली होती.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 12 Feb 2024
मुंबई : शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशास महापालिका शाळेकडून नकार, सिटी ऑफ लॉस एंजल्स शाळेतील धक्कादायक प्रकार

मुंबई : धारावीतील ७ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना माटुंगा येथील सिटी ऑफ लॉस एंजल्स या महापालिकेच्या शाळेने प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास कुंचन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

सविस्तर वाचा…

11:54 (IST) 12 Feb 2024
चिर्ले – कोन जोडरस्त्याच्या बांधकामाचा मार्ग मोकळा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मुंबईतून ३०-३५ मिनिटांत गाठता येणार

मुंबई, शिवडीवरून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३०-३५ मिनिटांत पोहचता यावे यासाठी हाती घेण्यात आलेल्या चिर्ले ते कोन जोडरस्त्याच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 12 Feb 2024
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहकारी कमलाबाई आंबेकर यांचे निधन

स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनेक आठवणी श्रीमती कमलाबाई आंबेकर या नेहमीच सांगत असत.

सविस्तर वाचा…

Maharashtra News Today 28 August 2023

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Maharashtra News Today 12 February 2024 : महाराष्ट्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Maharashtra news live pankaja munde uddhav thackeray eknath shinde breaking updates in marathi mumbai marathi batmya sgk

First published on: 12-02-2024 at 10:20 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×