Maharashtra News Live Updates, 10 October 2025 : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. तसेच पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आल्याच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा आणि २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या मागण्यांसाठी आज नागपूर येथे ओबीसी समाजाकडून मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Mumbai News Live Updates : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
प्रॅक्टिस चालत नसलेले वकील, आर्किटेक्ट सरकारकडे... केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले...
मोठी बातमी ! राज्यातील विद्युत कर्मचारी २४ तासातच संपावरून कामावर, कृती समिती म्हणते....
डोंबिवलीत घनश्याम गुप्ते रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे भाजप नगरसेवक दाम्पत्याचा उपोषणाचा इशारा
डोंबिवलीत घनश्याम गुप्ते रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे भाजप नगरसेवक दाम्पत्याचा उपोषणाचा इशारा
मुंबई महानगरपालिकेतील १५०० शिक्षकांची दिवाळी होणार गोड; भविष्य निर्वाह निधीसह निवृत्ती वेतनाचा मार्ग मोकळा
लढल्या शिवाय काही मिळत नाही…..दि. बा. पाटील यांच्या वक्तव्याची पुन्हा उजळणी… भूमिपत्रांमध्ये तीव्र प्रतिक्रिया.
वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; १४, १५ ऑक्टोबर रोजी सरकारसोबत होणार चर्चा
महावितरण, महापारेषण, महानिर्मितीचे अधिकारी- कर्मचारी विद्युत क्षेत्रातील खाजगीकरणासह इतर मागणीसाठी बुधवारी मध्यरात्री १२ वाजतापासून संपावर गेले होते. ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांच्या संपाला सुरवात केली होती. अखेर हा संप मागे घेण्यात आला आहे. सरकारने वाटाघाटी करण्यासंदर्भात अनुकूलता दाखवल्याने संप स्थगित करण्यात आला. मागण्यांसदर्भात १४, १५ ऑक्टोबर रोजी सरकारसोबत कर्मचाऱ्यांची चर्चा पार पडणार आहे.
Nagpur OBC Protest : ओबीसी प्रश्नावरून लक्ष्मण हाके यांचे विखे पाटील यांना नागपुरातून आव्हान
Video: आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्ताने तमन्ना भाटिया, विक्रांत मेस्सीचा खास संदेश; म्हणतात...
सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांच्या हस्तक्षेपामुळे महायुतीत वादाची ठिणगी, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी…
रिक्षा चालकांच्या संपाचा फटका सर्वसामान्यांना; भाडी नाकारल्याने सकाळच्या वेळेत नागरिकांची त्रेधातिरपीट
वडेट्टीवार यांच्याकडून ओबीसी समाजाची दिशाभूल: तायवाडे
Nagpur OBC protest : अभूतपूर्व! एक हजार बसेस अन् ५ हजार चारचाकी, ६० हजारांवर ओबीसी रस्त्यावर; एकच मागणी, जरांगे...
मध्यवर्ती कारागृहातून चार दिवसांत सहा मोबाईल जप्त, ‘सुरक्षा’ वारंवार भेदली..
अजित पवार गटाकडून शरद पवार गटाचे नेते अरूण गुजराथी यांची मनधरणी…?
‘‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय, निवडून येण्यासाठी आश्वासन द्यावी लागतात,’’ असं वक्तव्य करून राज्याच्या सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं. हे अत्यंत संतापजनक विधान आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद नाहीय तर नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं शेतकरी उध्वस्त झालाय, त्यामुळं कर्जमाफी करून दिलासा द्यावा, ही शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.
मंत्री महोदयांच्या अहमदपूर मतदारसंघात अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं. त्या भागात मी स्वतः दौरा केलाय. या भयानक संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी कर्जमाफीची अपेक्षा तिथल्या शेतकऱ्यांनी केली होती. यात तुम्हाला ‘नाद’ दिसत असेल तर हे दुर्दैव आहे. या राज्यकर्त्यांना मला एकच सांगायचंय शेतकऱ्यांचा नाद करू नका, अन्यथा खूप महागात पडेल…! , अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.