पंढरपूर : मुंबईतील मराठा समजाच्या आंदोलनात दंगल घडवून आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. त्यांचा हा प्रयत्न आणि महायुतीला बदनाम करण्याचा डाव अयशस्वी झाला आहे. या आंदोलनात रसद पुरवणारे काही प्रामाणिक होते तर काही रसद पुरवून दंगल घडविणारे देखील होते. अशा लोकांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत झालेल्या निर्णयामध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग तेवढाच महत्वाचा आहे असेही सांगत दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पाठराखण केली.
सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मराठा आंदोलन आणि विरोधकांवर नेहमीच्या शैलीत भाष्य करत विरोधकांना लक्ष्य केले. एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते माध्यमांशी बोलत होते. मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन केले. मुंबई येथील मराठा समाजाच्या आंदोलानात विरोधकांना दंगली घडवून महायुती सरकारला अडचणीत आणण्याचे काम करायचे होते. या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला.
मात्र दुर्दैवाने त्यांना यात यश आले नाही, ते उघडे पडले असा आरोप पाटील यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता याबाबत सोखल चौकशी करून अशा वातावरण बिघडवण्याचा डाव रचणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहाजीबापू पाटील यांनी केली.
मुंबईच्या आंदोलनात दोन गट कार्यरत होते. मुंबईत आलेल्या आंदोलकांना भाजी भाकरी, लोणचे भाकरी अशी रसद प्रामाणिकपणे पुरवत होते. तर दुसरीकडे आंदोलनात दंगल कशी घडेल याची रसद पुरवण्याचे काम विरोधकांनी केले आहे. या आंदोलनात मुख्यमंत्रीसह दोन्ही उप मुख्यमंत्री यांचा सहभाग तेवढाच महत्वाचा होता असेही पाटील यांनी सांगितले. तसेच समितीचे अध्यक्ष मंत्री विखे पाटील यांनी प्रश्न सोडविण्याच्या द्र्ष्टीने महत्वाची कामगिरी केली. मंत्री उदय सामंत आणि समितीच्या सर्व सदस्यांचे आभार पाटील यांनी मानले.
मुंबई येथील मराठा समाजाच्या आंदोलानात विरोधकांना दंगली घडवून महायुती सरकारला अडचणीत आणण्याचे काम करायचे होते. या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला. मात्र दुर्दैवाने त्यांना यात यश आले नाही, ते उघडे पडले असा आरोप पाटील यांनी केला.
दरम्यान, शहाजीबापू पाटील यांनी नेहमीच्या शैलीत संजय राउत यांच्यावर घणाघाती टीका केली. सरकार स्थापन झाल्यापासून राउत यांची जळफळाट सुरू आहे. या आंदोलनाच्या माध्यामातून दंगल घडेल आणि सरकार अडचणीत येईल असे राउत यांना वाटत असावे असा खळबळजनक दावा शहाजीबापू पाटील यांनी केला.