वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशात आगामी काळात अराजकता वाढेल असं वक्तव्य केलं आहे. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात दंगली घडवल्या जाऊ शकतात असंही वक्तव्य काही दिवसांपूर्वी त्यांनी केलं होतं. यावरून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीदेखील नारायण राणे यांनी केली होती. यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी याअगोदरही म्हटलं आहे की देशात दिवाळीनंतर कत्तल की रात (कत्तलींची रात्र) होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली दिसेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती यापूर्वी कधीच झाली नव्हती, तशी परिस्थिती निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व भारतीयांना माझा आग्रह आहे की, कोणी कितीही स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मतदान होईपर्यंत तुम्ही सर्वांनी शांतता राखा.

Chandrashekhar Bawankule, Candidates, merit,
बावनकुळे म्हणाले, उमेदवारांचा निर्णय जातीच्या आधारावर….
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
kiren rijiju controversial remarks on rahul gandhi
राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका
ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Prakash Ambedkar criticism of Jarange Patil over the election
जरांगेंनी निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावरील हे स्पष्ट; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर नारायण राणे म्हणाले, पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घ्यावं. त्यांची वक्तव्ये भयानक आहेत. हल्ला होणार आहे, मग त्याची माहिती प्रकाश आंबेडकरांना कुठल्या मार्गाने मिळाली? हे सगळं भयानक आहे. मुळात भाजपा ही राष्ट्राभिमानी पार्टी आहे. भाजपाची केंद्रात गेल्या १० वर्षांपासून सत्ता आहे. देशात १० वर्षांपासून एकच पंतप्रधान आहे. त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्यांची पोलिसांनी दखल घ्यावी.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं अशी मागणी करणाऱ्या नारायण राणेंना प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आगामी काळात मुसलमानांना कुठल्याही प्रश्नावरून लक्ष्य केलं जाईल. देशाच्या अनेक भागांमध्ये दिवाळीनंतर असे प्रकार घडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> “तुम्ही मराठ्यांना डिवचल्यावर…”, मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्या चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये. मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी आपल्या देशातील अनेक अधिकारी हे बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचे जनक मानतात. तेच अधिकारी मला ही माहिती देत असतात. मी त्या नारायण राणेंना एवढंच सांगतो, त्या चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये. मी बाबासाहेबांचा नातू आहे. मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी आपल्या देशातील अनेक अधिकारी हे बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचे जनक मानतात. तेच अधिकारी मला ही माहिती देत असतात. देशात अशी कुठलीही घटना घडू नये ही त्यांची अपेक्षा असते, म्हणूनच ते मला याची माहिती देतात.