कोल्हापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.40 टक्के इतका लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याने यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. 93.11 टक्केवारीसह कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. सातारा जिल्हा 92.18 टक्केवारी दुसर्‍या स्थानी आहे. सांगली जिल्ह्यातील 91. 63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुनरप्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 34.71 इतके आहे.

कोल्हापूर,सांगली व सातारा या तीन जिल्ह्यात 813 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. येथे बारावीसाठी 162 परीक्षा केंद्रे होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील 52 हजार 40 पैकी 48 हजार 853 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिल्ह्यात 34 हजार 268 पैकी 31 हजार 399 तर सांगली जिल्ह्यात 37 हजार 144 पैकी 34 हजार 328 विद्यालय विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

5 हजार 804 पुनरप्रविष्ट विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते.त्यातील 2016 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्ये विज्ञान शाखेचे विद्यार्थी सर्वाधिक असून त्यांची टक्केवारी 98. 51 टक्के आहे. कला शाखेचे 81. 24 टक्के, वाणिज्य शाखेचे 95. 35 टक्के तर व्यावसायिक शाखेचे 90. 37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 89 टक्के आहे. तर मुलींचे हेच प्रमाण 96.57 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 7. 56 टक्के इतके आहे.