बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या पाणी फाऊंडेशनबरोबर दुष्काळग्रस्त भागात जाऊन मदतीचा हात पुढे करत आहे. असं असलं तरीही त्याने आगामी चित्रपटांकडे दुर्लक्ष केलं नाहीये. सध्या तो ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत तो या चित्रपटाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने बिग बींनी आमिरला एक कानमंत्र दिला आहे.

कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करत असताना चित्रपटाच्या संपूर्ण टिमने एकत्र मिळून काम केले पाहिजे. चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, चित्रपटातील कलाकार यांनी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र रहायला पाहिजे. असे केले तरच प्रत्येक चित्रपट यशस्वी होतोच, असे बिग बी म्हणतात, असे आमीरने सांगितले. अमिताभ बच्चन यांचा ‘१०२ नॉट आऊट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

वाचा : माधुरी-करणचे बुमरॅंग एकदा पहाच !

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांच्याव्यतिरिक्त अभिनेत्री फातिमा सना शेख ही देखील दिसणार आहे. या नव्या चित्रपटासाठी बॉलिवूडचा एव्हर ग्रीन अभिनेता ऋषी कपूर यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत.