बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. मिलिंद कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच सोशल मीडयावर चर्चेत असतो. राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. त्यात अनेक बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी मिलिंदला देखील करोनाची लागण झाली होती. मात्र, योग्य औषधोपचाराने त्याने करोनावर मात केली. परंतु, एका जवळच्या व्यक्तीचे करोनाने निधन  झाल्यानंतर मिलिंदने सोशल मीडियावर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या मित्राचे करोना संक्रमणाने निधन झाले. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. त्याचं वय फक्त ४० वर्ष होतं. तर त्याला एक लहाण मूल देखील आहे. अनेक लोक मला विचारतात की मी इतका फिट असूनही मला करोनाची लागण कशी झाली. फिट असाल आणि तुमचं आरोग्य चांगलं असेल तर करोनाची लागण होण्याची शक्यता ही कमी असते, असे मिलिंद म्हणाला.”

 

पुढे तो म्हणाला, “अनेक लोक मला बोलतात, की मी आरोग्याबद्दल इतकं बोलतो पण बाहेर काही लोक आहेत ज्यांच्याकडे खायला सुद्धा काही नाही. त्यांनी काय करायचं? मला वाटतं जर तुम्ही निरोगी नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी या दुय्यम आहेत. तुमचं आरोग्य योग्य ठेवण्यासाठी सध्या घरात राहणं आवश्यक आहे. मी तुम्हाला विनंती करतो की घरी राहा आणि सुरक्षित राहा.”

दरम्यान, फक्त मिलिंद नाही तर त्याची आणि पत्नी देखील फिट आहेत. मिलिंदची आई ही वृद्ध लोकांसाठी प्रेरणा देणारी एक स्त्री आहे.