News Flash

‘द कपिल शर्मा शो’च्या टीमने घेतली करोना लस; सावधगिरीने केली सुरूवात

नवीन एपिसोडचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी कपिल आणि त्याच्या टीमनं सुरक्षिततेचं भान राखून आधी करोना लस घेतली आहे. याची एक सेल्फी कपिलने शेअर केलीय.

(Photo: Kapil Sharma/Instagram)

प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून कपिल शर्मा आज घराघरात पोहोचलाय. त्याच्यासोबतच त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ सुद्धा खूपच लोकप्रिय ठरला. नुकताच या शो चा प्रोमो पहायला मिळाला. या प्रोमोमध्ये शो मधील सगळेच कलाकार आपल्या अनोख्या अंदाजात एन्ट्री करताना दिसून आले. ‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या एपिसोड्सचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी त्याच्या संपूर्ण टीमने करोना लस घेऊन सावधगिरी बाळगत दमदार सुरूवात केलीय.

एका मोठ्या ब्रेकनंतर ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा टीव्हीवर भेटीला येतोय. याचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी कपिल आणि त्याच्या टीमनं सुरक्षिततेचं भान राखून आधी करोना लस घेतली आहे. या शोमधील होस्ट कपिल शर्माने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या टीमचा एक फोटो शेअर केलाय. ‘द कपिल शर्मा शो’ मधील कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, भारती सिंह, कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर सह शोमधील संपूर्ण कास्टने करोना लस घेतल्यानंतर कपिल शर्माने एक सेल्फी घेतली. त्याने क्लिक केलेली ही सेल्फी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिलीय. “तुम्ही करोना लस घेतली आहे का? ” असं या कॅप्शनमधून विचारत त्याने लोकांना करोना लस घेण्याचं आवाहन केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

‘द कपिल शर्मा शो’ची संपूर्ण टीम आता पुन्हा पहिल्यासारखं हसवण्यासाठी सज्ज झाली असून लवकरच नव्या एपिसोड्सचं शूटिंग सुरू होणार आहे. यापूर्वी या शो मधील स्टारकास्टनी प्रोमो शूट करतानाचे फोटोज आणि व्हिडीओज शेअर केले होते. या माध्यमातून त्यांनी नव्या सीजनासाठीची उत्सुकता व्यक्त केली होती. त्यांच्या या फोटोंवर फॅन्स देखील कमेंट्स करत त्यांची आतुरता व्यक्त करताना दिसून आले.

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान कपिल शर्माचा हा शो ऑफ एअर करण्यात आला होता. कपिल शर्माने त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर कुटुंबासह वेळ घालवता यावा यासाठी ब्रेक घेतला होता. तसंच करोना परिस्थितीमुळे या शोमध्ये गेस्ट देखील येत नव्हते. या सर्व परिस्थितीमुळे हा शो काही काळासाठी ऑफ-एअर करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला होता, असं बोललं जातं. मात्र आता कपिल शर्मा पुन्हा त्याच्या जुन्या टीमसह नव्याने टीव्हीवर भेटीला येणार असल्याने फॅन्स या शोची मोठ्या आतुरतेने प्रतिक्षा करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 10:25 pm

Web Title: before the start of the kapil sharma show the entire team took the vaccine with kapil prp 93
Next Stories
1 Bigg Boss OTT: सलमान खानने केली ‘बिग बॉस’ सीजन १५ ची घोषणा; टीव्हीवर नव्हे ओटीटीवर होणार रिलीज
2 करीना कपूरचा मुलगा जेहचा फोटो आला समोर; ईद निमित्ताने सारा अली खानने शेअर केली झलक; पण हे काय….?
3 Pornographic content case: राज कुंद्राच्या ऑफिसमधून मिळालं सर्व्हर, पॉर्न कंटेंट अपलोड केलं जात होतं?
Just Now!
X