News Flash

“मास्क घातलं तर दिखावा कसा करणार!”; लसीकरणाच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे दिव्या खोसला ट्रोल

मास्क न घातल्याने नेटकरी संतापले

गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटींनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत सेलिब्रिटींनी चाहत्यांना देखील लस घेण्याचं आवाहन केलंय. नुकतच अभिनेत्री दिव्या खोसलाने देखील करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणावेळेचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओमुळे दिव्या चांगलीच ट्रोल झालीय.

दिव्याने लसीकणर केंद्रतील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना लस घेण्याचं आवाहन केलंय. ” पहिली लस घेतली. माझी सर्वांना विनंती आहे की तुमची नोंदणी करून लसीकरण करून घ्या. आपण सर्व यात एकत्र आहोत. लसीकरण करून आणि सर्व नियमांच पालन करून करोनावर मात करूया.” अशा आशयाचं कॅप्शन दिव्याने या व्हिडीओला दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divyakhoslakumar (@divyakhoslakumar)

वाचा : “पैसे पचवतेस ही आणि म्हणते…” श्वेता तिवारीच्या आरोपांवर अभिनव म्हणाला…

दिव्याने शेअर केलेल्या व्हिडीओत लस घेताना तिने मास्क काढलेलं दिसतंय. यावरूनच नेटकऱ्यांनी दिव्यावर निशाणा साधला आहे. एक युजर म्हणालाय, “तुझं मास्क घाल.” तर दुसरा युजर म्हणालाय, ” जर तिने मास्क घातलं तर ती दिखावा कसा करणार?”
दिव्याने मास्क न घातल्याने अनेकांनी तिला ट्रोल केलंय. एक युजर म्हणालाय, ” एकीकडे ती नियमांचं पालन करा म्हणतेय आणि दुसरीकडे ती स्वत:चे शब्दचं पाळत नाहिय.” तर आणखई एक नेटकरी म्हणाला ” ती नक्कीच सूचनांच पालन करत नाहिय.”

divya-khosla-troll (photo-instagram@divyakhoslakumar)

अभिनेत्री अंकिता लोखंडेनेदेखील काही दिवसांपूर्वी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. यावेळी अंकिताला देखील तिच्या व्हिडीओमुळे ट्रोल व्हावं लागलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 12:32 pm

Web Title: divya khosla kumar troll after her vaccination video goes viral user said put your mask kpw 89
Next Stories
1 “राहुलचा मेसेज सोनू सूदपर्यंत पोहोचला असता तर..”, किश्वर मर्चेंटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
2 कोविड सेंटरसाठी बिग बींचा पुढाकार; केली इतक्या कोटींची मदत
3 मुलाच्या जन्मानंतर ‘ही’ अभिनेत्री करत होती नैराश्याचा सामना, जाणून घ्या कारण…
Just Now!
X