News Flash

‘या’ हॉलिवूडपटात निक-प्रियांका पहिल्यांदाच एकत्र

ऑफस्क्रीन जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीनवर एकत्र

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका विदेशातही सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच या दोघांची पर्सनल लाइफदेखील तितकीच चर्चिली जाते. त्यामुळे या दोघांनी एकत्र चित्रपट किंवा म्युझिक अल्बममध्ये पाहण्याची इच्छा चाहत्यांनी वारंवार व्यक्त केली होती. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. एका आगामी हॉलिवूडपटात निक-प्रियांका एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर प्रियांकाने तिचा मोर्चा हॉलिवूडपटांकडे वळवला. लवकरच प्रियांका ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे तिच्या या आगामी चित्रपटात निकदेखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


‘टेक्स्ट फॉर यू’ या हॉलिवूडपटात निक कॅमियो रोलमध्ये झळकणार आहे. लंडनमध्ये निक आणि प्रियांकाला या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना पाहण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा : वरुण धवन, क्रिती सेनॉन पाठोपाठ नीतू कपूरही करोना पॉझिटिव्ह

दरम्यान, टेक्स्ट फॉर यू या चित्रपटाच्या माध्यमातून निक पहिल्यांदाच प्रियांकासोबत काम करणार आहे. त्यामुळे या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु, निकच्या भूमिकेविषयी प्रियांका किंवा निककडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 1:02 pm

Web Title: hollywood nick jonas to make a cameo in priyanka chopra upcoming hollywood film text for you ssj 93
Next Stories
1 वरुण धवन, क्रिती सेनॉन पाठोपाठ नीतू कपूरही करोना पॉझिटिव्ह
2 राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील घरांची किंमत ठरली
3 Video: नेहा कक्करने केली अमिताभ बच्चन यांची नक्कल, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X