25 November 2020

News Flash

संजय राऊत यांना कुणाल कामराची ऑफर; “ते आले तरच…”

पाहा कुणालनं कोणती दिली राऊतांना ऑफर

‘सामना’च्या निमित्तानं मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना स्टँड अप कॉमेडिअन कुणाल कामरानंच चक्क एक ऑफर दिली आहे. ‘शटअप या कुणाल’ या पॉकास्टमध्ये ते सहभागी झाले तरच आपण त्याचा दुसरा सीजन सुरू करू असं कुणाल कामरा म्हणाले. त्यामुळे आता राऊत त्याची ऑफर स्वीकारतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

“संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन. अन्यथा काही शक्यता नाही,’ असं कुणाल कामरा म्हणाला. त्यानं यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या या मुलाखती फारच गाजल्या होत्या. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याचीही इच्छा व्यक्त केली होती.

कुणाल कामराच्या या शोमध्ये आतापर्यंत तत्कालिन काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांसह अनेक मोठी मंडळी सहभागी झाली होती. काही महिन्यांपूर्वी कुमालनं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनादेखील यांनीदेखील या कार्यक्रमात सहभागी व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 3:12 pm

Web Title: i will only restart our podcast shut up ya kunal if sanjay raut agrees to be the first guest of season 2 says kunal kamra tweet jud 87
Next Stories
1 ड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार?
2 महाराष्ट्र सरकारवर आरोप करणाऱ्या साहिल चौधरीला अटक; कंगनाने केली सुटकेची मागणी
3 कोठारेंची जलपरी! उर्मिलानं शेअर केला ‘जिजा’चा खास व्हिडीओ
Just Now!
X