News Flash

‘फ्रेंड्स रियुनियन’ ही मालिका नसून टॉक शो आहे…; हे कळल्यानंतर कतरिनाची बहिण इसाबेला नाराज

'फ्रेंड्स' मालिकेतील ते सहा कलाकार टॉक शोमध्ये येणार

गेल्या २७ वर्षांपासून जगभरतील प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली ‘फ्रेंड्स’ ही मालिका पुन्हा एकदा भेटीला येत असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागलेली होती. १७ वर्षानंतर नव्याने भेटीला येत असलेल्या या मालिकेसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच ही मालिका नसून एक टॉक शो असल्याचं समोर आल्यानं प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झालाय. इतकंच काय तर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिची मोठी बहिण इसाबेला कैफ ही सुद्धा नाराज झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच एचबीओ मॅक्स वाहिनीने ‘फ्रेंड्स: द रियुनियन’ शोचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. १७ वर्षांपुर्वी याच वाहिनीवर सुरू असेल्या ‘फ्रेंड्स’ या मालिकेने संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर मोहोर उमटवली होती. १७ वर्षांपूर्वी मे महिन्यातच ‘फ्रेंड्स’ या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता प्रदर्शित केलेला ट्रेलर पाहून ‘फ्रेंड्स’ या मालिकेचा पुढचा पर्व ‘फ्रेंड्स: द रियुनियन’ या नावाने भेटीला येणार अशी आशा सगळ्यांनाच लागली होती. ही अमेरिकन मालिका असली तरी भारतात देखील अगदी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत मोठ्या संख्येने लोक ही मालिका पाहत होते. काही दशकांपूर्वी ‘बिछडलेले’ या मालिकेतील मित्र-मैत्रिणी नव्याने भेटून जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या मालिकेच्या नव्या पर्वात काय असणार, यासाठी प्रेक्षक वेगवेगळे अंदाज देखील बांधत होते. या मालिकेच्या नव्या पर्वाबाबत नवे नवे अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतानाच एक आश्चर्य करणारी माहिती समोर आली. २७ मे रोजी प्रदर्शित होणारी ‘फ्रेंड्स: द रियुनियन’ ही मालिका नसून एक टॉक शो असल्याची माहिती समोर येतेय. याबाबतीत एचबीओ मॅक्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

ही माहिती कळल्यानंतर मालिकेच्या प्रेक्षकांप्रमाणेच मॉडेल इसाबेला कैफ भलतीच नाराज झाली आहे. १७ वर्षानंतर ही मालिका पुन्हा बघालया भेटणार या उत्सुकतेपोटी इसाबेला कैफने शनिवारीच तिच्या इस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तीने ‘फ्रेंड्स: द रियुनियन’चं पोस्टर शेअर केलं होतं. सोबतच एक कॅप्शन लिहित या मालिकेसाठी ती किती उत्सुक आहे, हे सांगितलं होतं. यात तिने लिहिलं होतं, “कोणी असा विचारही केला नव्हता की आम्हाला ‘फ्रेंड्स’ मालिकेचे एपिसोड पुन्हा बघायला मिळतील..”. पण त्यानंतर एचबीओ मॅक्सने पोस्ट शेअर केल्यानंतर मालिकेसाठी उत्सुक असेलली इसाबेला कैफ नाराज झाली.

Isabella inside (Photo: Instagram@isakaif)

२७ मे रोजी एचबीओ मॅक्स ‘फ्रेंड्स: द रियुनियन’ हा टॉक शो प्रदर्शित होणार आहे. तसंच ‘फ्रेंड्स’ या मालिकेतील सहा कलाकार रेचल, रॉस, मोनिका, फिबी, चॅन्डलर आणि जोई यांच्या भूमिका करणारे अनुक्रमे जेनिफर ॲनिस्टन, डेविड स्क्वीमर, कर्टनी कॉक्स, लिझा कुरदोव, मॅथ्यू पेरी आणि मॅट लिब्लॅंक हे या टॉक शोमध्ये सहभागी होणार असून मालिकेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत.

‘फ्रेंड्स: द रियुनियन’ हा ‘अनस्क्रिप्टेड’ टॉक शो असणार असून जेनिफर ॲनिस्टन, डेविड स्क्वीमर, कर्टनी कॉक्स, लिझा कुरदोव, मॅथ्यू पेरी आणि मॅट लिब्लॅंक ही सर्व ‘फ्रेंड्स’ मालिकेतल्या स्वतःच्याच अवतारात असणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 6:49 pm

Web Title: isbaelle kaif disappointed after knowing friends reunion is talkshow prp 93
Next Stories
1 ‘या’ अभिनेत्रीमुळे के. एल. राहुल आणि अथिया शेट्टीच्या नात्यात आला दुरावा?
2 सनी लिओनीच्या गाऊनची चेन अडकली, मदतीसाठी आख्खी टीम सरसावली!
3 अनिकेत आणि मनूच्या प्रेमकहाणीने घेतलं सुंदर वळण