News Flash

‘माझ्या मुलीच्या फोटोशी छेडछाड करण्याची दिली धमकी’, केआरकेने मिका विरोधात केली तक्रार

केआरकेने मिका सिंग विरोधात मुंबई पोलिस आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

केआरकेने मिका सिंग विरोधात मुंबई पोलिस आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

अभिनेता कमाल आर खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. आता केआरके त्याच्या आणि मिका सिंगमध्ये सुरु असलेल्या सोशल मीडिया वादामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मिकाने केआरकेवर एक गाणं बनवलं होतं. त्या गाण्यावरून केआरकेने मिका सिंग विरोधात मुंबई पोलिस आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या गाण्यात मिकाने त्याच्या फोटोंशी छेडछाड केल्याचे केआरकेने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘अमृताला कानशिलात लगावली मला त्याच वाईट वाटतं नाही’, इशा देओलने केला खुलासा

केआरकेने ट्वीट करत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये मुंबई पोलिस आणि आयुक्तांना टॅग केले आहे. “आदरणीय मुंबई पोलिस आणि मुंबई पोलिस आयुक्त, कृपया या कडे लक्ष द्या मिका सिंगने माझ्या फोटोंशी छेडछाड केली आहे आणि त्याचे गाणे प्रदर्शित केले आहे. आता तो माझ्या १४ वर्षाच्या मुलीच्या फोटोंशी छेडछाड करत गाणं प्रदर्शित करण्याची धमकी देत आहे. माझ्याकडे त्याचे सर्व मेसेजेस आणि रेकॉर्ड आहेत. कृपया माझी एफआयआर नोंदवा”, अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे.

krk complaint against mika singh केआरकेने मिका सिंग विरोधात मुंबई पोलिस आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई’ प्रदर्शित झाल्यानंतर केआरकेने सलमानशी पंगा घेतला. केआरकेने फक्त त्या चित्रपटाची नाही तर सलमानबद्दल अनेक गोष्टी बोलल्या, त्यानंतर सलमानने त्याच्यावर मानहानीचा दावा केला. हे पाहता मिकाने या वादात उडी मारली आहे. तर मिकाने ‘केआरके कुत्ता’ हे गाणं प्रदर्शित केलं.

आणखी वाचा : सलमानने नकारलेल्या ‘या’ चित्रपटांमुळे शाहरुख झाला रातोरात स्टार, जाणून घ्या चित्रपटांविषयी

मिकाने ‘केआरके कुत्ता’ हे गाणं १० जून रोजी त्यांच्या युट्युब अकाऊंटवरून प्रदर्शित केलं आहे. या आधी मिकाने हे गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे, अशा आशयाचं ट्वीट करतं या गाण्याचा रिव्ह्यु देण्यास केआरकेला सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 3:17 pm

Web Title: krk complaint against mika singh to mumbai police after he release song krk kutta actor says he is threatening to release video of her daughter dcp 98
Next Stories
1 वीरू राजकारणात ठरणार ‘लयभारी’
2 या दिवशी प्रदर्शित होणार ‘तुफान’ चित्रपट
3 जॅकलीन फर्नांडिस ‘सीक्रेट बॉयफ्रेण्ड’सोबत नव्या घरात राहणार एकत्र!
Just Now!
X