अभिनेता रितेश देशमुख याची पावले पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळली असून त्याचा माऊली हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.त्यामुळे रितेशच्या चाहत्यांना या आगामी चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली असून त्यातच या चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आज कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर ‘माझी पंढरीची माय’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. रितेशने ट्विटरच्या माध्यमातून या गाण्याची लिंकदेखील शेअर केली आहे.
SONG OUT NOW!
आजच्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, माऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!!#MajhiPandharichiMaay #Mauli14Dec #MeMauli #YetoyMauli @geneliad @SaiyamiKher @AjayAtulOnline @guruthakur @mfc @JioMusicHD @h_talkies @AdityaSarpotdarhttps://t.co/OjN8A4cd3d
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 19, 2018
चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर हे पोस्टर अभिनेता शाहरुख खान शेअर केलं होतं. त्यानंतर आता माऊलीमधील पहिलंच गाणं अभिनेता अक्षय कुमारने देखील शेअर केली आहे. त्यामुळे बॉलिवूडकरांना देखील रितेशच्या माऊलीची भूरळ पडत असल्याचं दिसून येत आहे.
आजच्या कार्तिकी एकादशीला, माऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!! मला खूपच आवडलं, तुम्हालाही नक्की आवडेल!!#MajhiPandharichiMaay #Mauli14Dec #MeMauli #YetoyMauli @geneliad @Riteishd https://t.co/bjMVahmBOy
— Akshay Kumar (@akshaykumar) November 19, 2018
दरम्यान, ‘हे गाणं मला प्रचंड आवडं आहे, तुम्हालाही नक्की आवडेल’, असं म्हणत अक्षयने माऊलीतील गाणं शेअर केलं आहे. त्यानंतर रितेशने सोशल मीडियावर अक्षयचे आभारदेखील मानल्याचं दिसून आलं. १४ डिसेंबर रोजी रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘हिंदुस्तान टॉकीज’च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे.