विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. चंद्राच्या भूमिकेमुळे अमृता ही चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच एका मुलाखतीत अमृताने चंद्राच्या भूमिकेबद्दलचा प्रवास तसेच तिला याबद्दल काय वाटते? याबद्दल खुलासा केला आहे.

चंद्रमुखी या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अमृता खानविलकरची ‘बीबीसी मराठी’ने मुलाखत घेतली. या मुलाखतीत तिने या चित्रपटातील तिच्या भूमिकासाठी काय काय तयारी करावी लागली? ही भूमिका तिच्यासाठी का खास आहे? याबद्दल सांगितले आहे. तसेच हा चित्रपट काय आहे? त्याबद्दल तिला काय वाटते? याचाही खुलासा तिने केला आहे.

“पॅक-अपनंतर आम्ही आधी त्यावरचं रक्त काढायचो अन्…”, अमृता खानविलकरने सांगितला ‘चंद्रमुखी’च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

“चंद्रमुखी हा चित्रपट विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित आहे. मी ती कादंबरी जवळपास १८ वेळा वाचली आहे. जेव्हा पहिल्यांदा मी हे पुस्तक वाचत होते, तेव्हा मी लंडनच्या फ्लाईटमध्ये होते. जवळपास सात ते आठ तास बसून मी ती कांदबरी संपूर्ण वाचली. विश्वास पाटील यांची ही कादंबरी अतिशय अजरामर आहे. विश्वास पाटील यांच्या या कादंबरीची व्याप्ती फार मोठी आहे”, असे अमृताने म्हटले.

त्यापुढे अमृता म्हणाली, “चंद्रा ही फक्त एक लोककलावंत नाही किंवा लावणी सम्राज्ञी नाहीये. चंद्रमुखी हा चित्रपट प्रेमाचा आहे. बलिदानाचा आहे. यात राजकारणही आहे आणि त्यात जी प्रेमकहाणी दडली आहे त्याचाही आहे. चंद्रा ही कृष्णभक्त आहे. ती स्वतःच्या कलेसाठी, कला लोकांसमोर सादर करण्यासाठी धडपडत आहे. आपली लोककला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं तिचं ध्येय आहे. चंद्रा ही प्रत्येक कलाकाराची कथा आहे.”

‘चंद्रमुखी’साठी आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकरची निवड का केली? प्रसाद ओकने सांगितले कारण

यावेळी अमृताला तुझ्या चंद्रा या भूमिकेबद्दल तू काय सांगशील? ती भूमिका तुझ्यासाठी काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “माझ्या भूमिकेबद्दल सांगताना मी एवढंच म्हणेन की, चंद्रा ही पात्र फक्त लावणी सम्राज्ञी नाही. तसेच ती केवळ नृत्यांगनाही नाही. ती एक प्रेमिका आहे. कृष्णभक्त आहे. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये चंद्रा आणि चंद्रमुखीमध्ये प्रत्येक स्त्री आहे. कारण स्वतःच्या कलेसाठी झोकून देऊन काहीतरी करणं, झोकून देऊन प्रेम करणं हे फक्त एका स्त्रीलाच जमू शकते आणि त्याचेचं प्रतिबिंब म्हणजे चंद्रमुखी आहे.”

“मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती…”, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.