अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने तिच्या अभिनय कौशल्याने आजवर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. लवकरच भार्गवी ही एका वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येत आहे. कलर्स मराठीवर येत्या २७ डिसेंबरपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आई मायेचं कवच’ असे या मालिकेचे नाव आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. सध्या या प्रोमोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोत भार्गवी ही वर्किंग वूमन असल्याचे दिसत आहे. त्यासोबच ती आई म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. या मालिकेचा प्रोमोत ही कथा आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असल्याचे दिसत आहे.

एकीकडे आई म्हणून जबाबदारी पार पाडणारी, मुलीच्या प्रती काळजी करणारी भार्गवी दिसत आहे. तर दुसरीकडे याचा गैरफायदा घेत तिची मुलगी कॉलेजमध्ये लेक्चर बंक करत पार्टी करताना दिसत आहे. या मालिकेचा हा प्रोमो पाहून एकंदर मालिकेत पुढे काय होणार? ही मालिका कशी असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

“तुम्ही तुमच्या मुलांना किती ओळखता? आजच्या धकाधकीच्या आयुष्यात हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडलेला दिसतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधता, शोधता उलगडलं जाणार आई-मुलीचं नातं; पाहूया नवी गोष्ट ‘#Aai मायेचं कवच’; 27 डिसेंबरपासून रात्री 10 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर,” असे कॅप्शन देत कलर्स मराठीने हा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : “प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भार्गवी चिरमुले ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे. भार्गवीने आतापर्यंत ‘आयडियाची कल्पना’, ‘संदूक’, ‘धागेदोरे’, ‘अनवट’ अशा अनेक चित्रपटांत झळकली आहे. भार्गवीने ‘वहिनीसाहेब’, ‘अनुबंध’, ‘असंभव’, ‘पिंजरा’, ‘मेरे साई’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ यासारख्या अनेक गाजलेल्या मालिकेत काम केले आहे.