९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या दमदार अभिनयासाठीही ओळखली जाते. सोनालीने तिच्या कारकिर्दीत अनेक उत्तम आणि हिट चित्रपट दिले आहेत. तिने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानबरोबर काम केले आहे.

तुम्हाला माहिती आहे का की सोनाली ही एकमेव बॉलीवूड अभिनेत्री आहे, जिला १९९६ मध्ये मायकल जॅक्सन त्याच्या ‘वर्ल्ड टूर’दरम्यान भारतात आल्यावर त्याचे स्वागत करण्याची संधी मिळाली होती. हे स्वतः सोनालीने उघड केले आहे.

मायकल जॅक्सन ‘हिस्ट्री वर्ल्ड टूर’साठी भारतात आला होता

सोनाली बेंद्रेने अलीकडेच एएनआयला मुलाखत दिली. सोनाली मुलाखतीत म्हणाली, “१९९६ मध्ये मायकल जॅक्सन हिस्ट्री वर्ल्ड टूरसाठी भारतात आला होता. मला एक फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की, तुला यायचं आहे आणि कोणीतरी माझ्याशी संपर्क साधला. मला वाटते की, त्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे होत्या. राज यांच्या पत्नी शर्मिला आणि माझी मावशी खूप जुन्या मैत्रिणी आहेत. त्यांनी म्हटले, “तुम्ही मायकल जॅक्सनचे स्वागत का करत नाही?’ त्यावेळी सोनाली तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती आणि एकामागून एक हिट चित्रपट देत होती.

सोनाली म्हणाली, “नंतर मी विमानतळावर मायकल जॅक्सनचे स्वागत करण्यास सहमती दर्शविली आणि हो म्हणाली, पण माझी स्वतःची एक अटही ठेवली. मी म्हणाले ठीक आहे, पण नंतर मला शोसाठी सर्वोत्तम तिकिटे आणि माझ्या मित्रांसह सर्वकाही हवे आहे. मी ते केले, कारण मला माझ्या बहिणी आणि तिच्या मैत्रिणींसह शोमध्ये जाण्यासाठी तिकिटे मिळत होती. मी सर्वात जास्त उत्साहित होते.” मुंबई विमानतळावर मायकल जॅक्सनचे अधिकृतपणे स्वागत करणारी एकमेव भारतीय चित्रपट अभिनेत्री बनून तिने इतिहास रचला. त्यावेळी सोनालीने पारंपरिक नऊवारी साडी परिधान केली होती.

सोनाली बेंद्रेने बॉलीवूडमध्ये तिच्या करिअरमध्ये ‘दिलजले’, ‘सपूत’, ‘रक्षक’, ‘आग’, ‘सरफरोश’, ‘किमत’, ‘हम साथ साथ हैं’, ‘इंद्र’, ‘कल हो ना हो’सारखे हिट चित्रपट दिले आहेत. कॅन्सरसारख्या भयंकर आजाराशीही सोनालीने झुंज दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.