अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रनवे 34’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंह हे तीन कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. येत्या २९ एप्रिल २०२२ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘रनवे 34’ या चित्रपटाची कथा जेट एअरवेजच्या दोहा कोची फ्लाइटच्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. ही घटना २०१५ मध्ये घडल्याचे बोललं जात आहे. खराब हवामान आणि खूपच कमी दृश्यमानता असूनही पायलटने धोका पत्करून विमान कशाप्रकारे विमानतळावर उतरवले याचा थरार या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात अजय देवगणच्या फ्लाईट प्रवासाने होते. यात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह हे दोघेही पायलटच्या भूमिकेत दिसत आहे. हे दोघेही एकत्र विमान उडवत असताना अचानक खराब हवामानामुळे त्यांच्या विमानाचा तोल बिघडतो. यानंतर त्यांना कशाप्रकारे कठीण परिस्थितीचा सामना करत विमानाची इमर्जन्सी लँडिग करावी लागते, याचा संपूर्ण थरार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या प्रकारच्या लँडिंगला एक प्रकारे ब्लाईंड लँडिंग असे म्हणतात. या लँडिंगमध्ये सुमारे १५० प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

‘रनवे 34’ या चित्रपटाद्वारे अजय देवगण हा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याने स्वत: केली आहे. तो स्वतः यात मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची कथा जेट एअरवेजच्या दोहा कोची फ्लाइटच्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. ही घटना २०१५ मध्ये घडल्याचे बोललं जात आहे. ‘रनवे 34’ हा चित्रपट कॅप्टन विक्रांत खन्ना यांच्यावर आधारित आहे. यात अजय देवगण हा कॅप्टन विक्रांत खन्नाच्या भूमिकेत दिसत आहे. तर नारायण वेदांत उर्फ ​​अमिताभ बच्चन हे या प्रकरणाच्या खोलात जाऊन कशाप्रकारे सत्य उघड करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट ईदच्या आधी म्हणजे २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंह, अंगिरा धर, बोमन इराणी आणि आकांक्षा सिंग हे कलाकार झळकणार आहे. अजय देवगण दिग्दर्शित या चित्रपटात प्रसिद्ध यूट्यूबर कॅरी मिनाटी अर्थात अजय नागर देखील आहे. हा त्याचा डेब्यू चित्रपट असणार आहे.