scorecardresearch

बडे मियाँ छोटे मियाँच्या रिमेकमध्ये टायगर श्रॉफच्या बरोबर झळकणार ‘ही’ अभिनेत्री?

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोन अभिनेते देखील पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

बडे मियाँ छोटे मियाँच्या रिमेकमध्ये टायगर श्रॉफच्या बरोबर झळकणार ‘ही’ अभिनेत्री?
bollywood actor tiger shroff

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ डेव्हिड धवन यांचा हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रथमच अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांनी एकत्र काम केले होते. त्याकाळात गोविंदा सर्वात प्रसिद्ध अभिनेता होता. विनोदी अभिनेता म्हणून त्याची ख्याती होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसर मोठ्या प्रमाणावर हिट ठरला होता. माधुरी दीक्षित देखील यात पाहुणी कलाकार म्हणून दिसली. आता याच सुपरहिट चित्रपटाचा रिमेक करण्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली.

बडे मियाँ छोटे मियाँ रिमेकमध्ये टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पूजा एंटरटेनमेंटने फेब्रुवारी २०२२ मध्ये चित्रपटाचा एक छोटा टीझर रिलीज केला. निर्माते सध्या या चित्रपटातील दोन प्रमुख कलाकारांच्या विरुद्ध दोन अभिनेत्रींच्या शोधात आहेत. यातील अभिनेत्रींच्या नावावर शिक्कामोर्तब होणे बाकी असताना इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार ‘श्रद्धा कपूर’ ही अभिनेत्री टायगर श्रॉफ बरोबर झळकणार अशी चर्चा आहे. निर्मात्यांची देखील पहिली पसंती श्रद्धा कपूरच आहे.

केआरके पुन्हा ट्रोल : बॉलिवूडला वाचवायचे असेल तर ‘अशा’ लोकांना बॅन करा

श्रद्धा कपूर बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. ती शेवटची प्रभाससोबत साहोमध्ये दिसली होती. २०१६ मध्ये टायगर आणि श्रद्धाने बागी या चित्रपटात काम केले होते. पुन्हा एकदा या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी देखील पसंती दर्शवली आहे. श्रद्धा कपूर चालबाज या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. तसेच लव्ह रंजन यांच्या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे स्पष्टीकरण दिले की, ‘आम्ही सध्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन्स शोधात आहोत. या रिमेकसाठी कोणत्याही प्रकारची कसर प्रॉडक्शन हाऊस सोडणार नाही’. पुढील वर्षापर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या तारख्या घेतल्या जातील. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोन अभिनेते देखील पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या