बिग बी अमिताभ बच्चन सिनेमांसोबतच सोशल मीडियावरदेखील चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधतात. तसचं बिग बी आपल्या ब्लॉगमधून देखील अनेक मुद्दयावर भाष्य करतात. रोजच्या आयुष्यातील घडामोडी ते ब्लॉगमधून चाहत्यांसोबत शेअर करतात. बिग बी अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये घरातील एक समस्या मांडली आहे. घरात पाणी नसल्याचं बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय.
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये सांगितलं की जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’च्या शूटिंगसाठी ते सकाळी ६ वाजता उठले तेव्हा त्यांच्या घरात पाणी येत नव्हतं. ते म्हणाले, “मी सकाळी ६ वाजता उठलो आणि पाहिलं तर घरात पाणी येत नव्हतं. आता परत पाणी येत नाही तोपर्यंत मला कनेक्ट होण्यासाठी वेळ मिळाला. यानंतर मी कामसाठी निघेन आणि थेट वॅनिटीमध्येच तयार होईन.”
हे देखील वाचा: ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये ‘तो’ शब्द उच्चारताना अमिताभ बच्चन यांची देखील बोबडी वळली
घरातील ही समस्या चाहत्यांसोबत शेअर करताना बिंग बींनी चाहत्यांची माफी देखील मागितली. “ओ..डियर, या घरगुती समस्यांमध्ये तुम्हाला सामील करून घेतल्याबद्दल माफी मागतो…पण ठिक आहे आता नाही बोलणार… आजचा दिवस थोडा कठिण होता.” यासोबत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ‘चेहेरे’ सिनेमाबद्दलही लिहिलं आहे. या सिनेमा काही राज्यातच प्रदर्शित होईल असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी चाहत्यांनी थोडा संयम राखून चित्रपटगृह सुरु होण्याची वाट पहावी असं ते म्हणाले.
View this post on Instagram
;
‘चेहेरे’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. यानंर बिग बींचा ‘झुंड’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमाशिवाय बिग बी ‘ब्रह्मास्त्र’, ‘मेडे’, ‘गुडबाय’ आणि ‘द इंटर्न’ या सिनेमांमध्ये विविध भूमिकांमध्ये झळकणार आहेत.