“आपलेच मित्र आपल्या मागून…”, स्नेहा वाघ बिग बॉसच्या ‘या’ स्पर्धकावर संतापली

यात अभिनेत्री स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांचा समावेश आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’चे ३ पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून प्रेक्षकांना सतत स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला अवघे काही आठवडे बाकी आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचा पुढील सर्व भाग प्रचंड रंगतदार होताना पाहायला मिळत आहे.

बिग बॉसमध्ये गेल्या आठवड्यात एकही स्पर्धक घराबाहेर पडला नाही. त्यामुळे घरातील सदस्य हे फार आनंदात असल्याचे पाहायला मिळत होते. तर दुसरीकडे पुढील ट्विस्टमुळे घरातील सदस्यांच्या मनात धडकी भरवली आहे. बिग बॉसमधून काही दिवसांपूर्वीच बाहेर पडलेल्या तीन सदस्यांनी बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री घेतली. यात अभिनेत्री स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांचा समावेश आहे.

नुकतंच कलर्स मराठीने याबाबतचे दोन प्रोमोशनल व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एक व्हिडीओ स्नेहा वाघही घरात आल्यानंतर जय दुधाणेवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. कलर्सने शेअर केलेल्या व्हिडीओत स्नेहा घरात येताना दिसत आहे. घरात आल्यावर ती सर्वांना भेटते आणि त्याचवेळी घरात असताना फार मोठा विश्वासघात झाल्याचे म्हणते.

हेही वाचा : Video : ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’; गायत्री आणि मीराचा ‘बिग बॉस’च्या घरात अतरंगी डान्स

स्नेहा जेवणाच्या टेबलवर सगळ्यांसमोर जय दुधाणेवर गंभीर आरोप करते. “या घरात सुरुवातीपासून माझ्यासोबत कुणी गेम खेळत असेल तर तो जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपली एवढी इज्जत काढत नाही,” असे स्नेहा संतापून जयला बोलते.

स्नेहाने जयवर गंभीर आरोप केल्यानंतर जया भावूक झालेला दिसत आहे. यावेळी त्याला उत्कर्ष आणि मीरा समजवताना दिसत आहेत. मीरा जयला हा ही टास्कचा एक भाग आहे वाईट वाटून नको घेऊ असे सांगताना दिसत आहेत. दरम्यान यानंतर आता हे तीन नवीन सदस्य अजून किती दिवस घरात राहणार? यादरम्यान काय काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss marathi season 3 actress sneha wagh reenter in house and targets the contestant nrp

ताज्या बातम्या