अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असून ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. ऐश्वर्या तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बच्चन कुटुंबियांबरोबर नव्हती, तिने फक्त आई व मुलगी आराध्याबरोबर सेलिब्रेशन केलं, तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच अभिषेक व ऐश्वर्याचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हे दोघे एकमेकांबद्दल बोलताना दिसतात.

सध्या अभिषेकच्या एका विधानाची चर्चा आहे, ज्यामध्ये तो पत्नी ऐश्वर्याची न आवडणारी गोष्ट सांगताना दिसतो. एकदा अभिषेक आणि त्याची मोठी बहीण श्वेता बच्चन नंदा ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये पाहुणे म्हणून गेले होते. या शोमध्ये अभिषेकला विचारण्यात की त्याला ऐश्वर्याची कोणती सवय आवडत नाही आणि तो ती सहन करतो. याचं उत्तर देताना अभिषेकने सांगितलं होतं की त्याला ऐश्वर्याचे पॅकिंग कौशल्य आवडत नाही आणि त्याला ते सहन करावं लागतं.

काही जणांना बॅग नीट पॅक केलेली आवडते, तर अनेकांना नीट बॅग पॅक करता येत नाही. अभिषेकलाही ऐश्वर्याचे बॅग पॅक करण्याचे कौशल्य अजिबात आवडत नाही असं त्याने सांगितलं होतं. याच मुलाखतीत ऐश्वर्या कधीच वेळेवर मेसेजला रिप्लाय देत नाही, अशी तक्रार श्वेता बच्चनने केली होती.

“आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या व अभिषेकच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायला सोशल मीडियावरून अनफॉलो केल्याच्याही बातम्या आल्या होत्या. सध्या तरी या दोघांच्या नात्याबद्दल फक्त चर्चा आहेत. याबद्दल अभिषेक, ऐश्वर्या किंवा त्यांच्या कुटुंबाने कोणतंही भाष्य केलेलं नाही.