बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. फोटोशूट असो किंवा आगामी चित्रपटाची घोषणा सारा कायमच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकतीच तिने एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

‘लव्ह आजकल २’ चित्रपटाच्या दरम्यान हे दोघे एकत्र आले होते, तेव्हा या चित्रपटानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये होते अशी चर्चा सुरु होती मात्र नंतर ते दोघे वेगळे झाले. दोघांनी कधीच जाहीर केले नव्हते. आज कार्तिक आर्यनचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं आहे, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कार्तिक आर्यन. मला आशा आहे की यावर्षी तुझ्या ज्या अपेक्षा, स्वप्न असतील ती पूर्ण होतील.’ अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“मनात आत्महत्येचे विचार…” ‘हड्डी’ चित्रपटातील मराठमोळ्या गंगाने सांगितला धक्कादायक अनुभव

कार्तिक आर्यननंतर सारा अली खान आणि क्रिकेटर शुबमन गिल ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच दोघंही फ्लाइटमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. सारा अली खान सध्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.तसेच विक्रांत मेस्सीबरोबर ‘गॅसलाईट’ चित्रपटात दिसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तिक आर्यन हृतिक रोशनच्या बहिणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते दोघे लॉंग ड्राइव्हला गेल्याच्या चर्चाही होत्या. कार्तिक लवकरच ‘फ्रेडी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.