बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने सौदी अरेबिया येथे झालेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली. यावेळी संवाद साधताना त्याने आपल्या करिअरबद्दल भाष्य केलं. तसेच हृतिकने बॉलिवूडमध्ये यावं, अशी त्याचे वडील राकेश रोशन यांची मुळीच इच्छा नव्हती, याचाही खुलासा केला. हृतिकने वडील राकेश रोशन यांच्याच २००० मध्ये आलेल्या ‘कहो ना…प्यार है’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’ मध्ये एकत्र काम केलं.

हेही वाचा – ‘सिर्फ तुम’ चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया गिल सध्या काय करते? जाणून घ्या कुठे आहे अभिनेत्री

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, हृतिक म्हणाला की राकेश रोशन यांनी तब्बल २० वर्षे संघर्ष केला होता, त्यामुळे तसाच संघर्ष आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये, असं त्यांना वाटत होतं. “माझ्या वडिलांचा मी चित्रपटांमध्ये यावं, याला विरोध होता, कारण त्यांना खूप संघर्षातून जावं लागलं होतं. त्यांनी तब्बल २० वर्षे खूप संघर्ष केला होता आणि ते ज्या परिस्थितीतून गेले त्यामधून मी जावे अशी त्यांची इच्छा नव्हती,” असं हृतिकने सांगितले. तसेच आपल्या ठाम निश्चयामुळे मी अभिनेता बनलो, असंही त्याने सांगितलं.

सोनमने न्यूड सीन देण्यास नकार दिला अन् निर्मात्यांनी तिला…., तब्बल ३३ वर्षांनी अभिनेत्रीचा खुलासा

हृतिकला अभिनेता व्हायचं होतं, याचं एक सर्वात मोठं कारण म्हणजे तो तोतरा बोलायचा आणि त्यामुळे त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. “मला स्वतःला सिद्ध करायचं होतं, कारण मी तोतरा बोलायचो आणि त्यामुळे मोठा होत असताना मला खूप अडचणी आल्या होत्या. अभिनय ही सामान्य दिसण्याची आणि फील करण्याची माझ्यासाठी एक संधी होती,” असं हृतिक यावेळी म्हणाला.

मुलानेच केली अभिनेत्रीची हत्या, मृतदेह फेकला माथेरानच्या जंगलात; धक्कादायक कारण आलं समोर

हृतिकला २०१२ पर्यंत स्पष्ट बोलता यायचं नाही. तो थोडा तोतरा बोलायचा, त्यामुळे त्याचं लहानपण इतरांसारखं सामान्य नव्हतं. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “या समस्येमुळे मी सर्वांना समान समजू लागलो. मला भेटणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये मी स्वतःला पाहतो, ज्यामुळे मला लोकांशी सहज संपर्क साधता येतो. हे मला खूप सहानुभूतीशील, सहनशील आणि संयमी बनवते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास हृतिक पुढे ‘फायटर’मध्ये दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्यासमवेत काम करणार आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.