वादात अडकूनही ‘आदिपुरुष’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी जगभरात १४० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या ‘आदिपुरुष’ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर देशभरात ६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने हिंदी भाषेत ३७ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर तेलुगू भाषेत २६ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत जगभरात २०० कोटी रुपये कमावले.
‘आदिपुरुष’मधील ‘त्या’ दाव्यावर नेपाळची नाराजी, भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर घातली बंदी
‘आदिपुरुष’च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ६४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपट वादात अडकला आहे, खूप टीकाही होत आहे. मात्र प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यास गर्दी करत आहेत. परिणामी चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चांगली कमाई केली. अशा रितीने चित्रपटाचं तीन दिवसांचं कलेक्शन ३०० कोटींच्या जवळपास पोहोचलं आहे.
या आठवड्यात ‘आदिपुरुष’शिवाय दुसरा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने त्याचा फायदा या चित्रपटाला झाला. चित्रपटाने वीकेंडला चांगली कमाई केली. २३ जूनला अजय देवगणचा ‘मैदान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची जादू शुक्रवारपर्यंत प्रेक्षकांवर राहील की नाही ते लवकरच कळेल.