Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: भारताचे मोठे उद्योगपती मुकेन अंबानी सध्या लेकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंगचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. कालपासून (१ मार्च) सुरू झालेल्या प्री-वेडिंगमध्ये बॉलीवूडसह उद्योग जगतातील दिग्गज मंडळी उपस्थित राहिले आहेत.

अनंत-राधिका यंदा जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्याआधी १ मार्च ते ३ मार्चपर्यंत प्री-वेडिंगचा कार्यक्रम गुजरातमधील जामनगरमध्ये सुरू आहे. ज्याप्रमाणे मुकेश अंबानींनी मोठा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नात जगप्रसिद्ध गायिका बियोंसेला परफॉर्मन्साठी बोलावलं होतं. त्याप्रमाणे छोट्या मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाला मुकेश अंबानींनी बोलावलं आहे. सध्या रिहानाची जोरदार चर्चा रंगली आहे. रिहाना भारतात पोहोचली असून तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल झाले आहेत. पण या रिहानाला काही तासांच्या परफॉर्मन्ससाठी मुकेश अंबानींनी किती मानधन दिलंय माहितीये?

हेही वाचा – अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये रिहानाचा जबरदस्त परफॉर्मन्स; मंचावर थिरकले अंबानी कुटुंबीय, तर गायिका भारताबद्दल म्हणाली…

डेली मेलच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी अनंत-रिहाना यांच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्मन्साठी रिहानाला तब्बल ५२ कोटी रुपये दिले आहेत. तसेच या संपूर्ण कार्यक्रमावर एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय कॅटरिंगवर १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान, गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा झाला होता. माहितीनुसार, १२ जुलैला अनंत व राधिका यांचा मुंबईत शाही लग्नसोहळा होणार आहे.