शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. बुधवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सर्वच शोज हाऊसफुल होताना दिसत आहेत. या चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट त्याचे चाहते एखाद्या उत्सवाप्रमाणे सेलिब्रेट करत आहेत. आता हा चित्रपट सुरू असतानाच एका चित्रपटगृहातील व्हिडीओ समोर आला आहे. यात शाहरुखचं गाणं सुरू असताना त्याच्या चाहत्याने चक्क नोटा उडवल्याचं दिसत आहे.

पठाण चित्रपटाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतातून २८२ कोटी तर जगभरातून ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. शाहरुख खानबद्दल प्रेम दर्शवण्यासाठी अनेकांनी ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर्सच बूक केली. तर या चित्रपटाचा शो सुरू असताना चित्रपटगृहतील माहोल कसा असतो हे दर्शवणारे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ आणि ‘झुमे जो पठाण’ ही गाणी सुरू झाली की लोक मोठ्या प्रमाणावर नाचू लागतात. तर आता एका चाहत्याने चक्क नोटा उडवल्या.

आणखी वाचा : Pathaan box office collection: चौथ्या दिवशीही सर्वत्र ‘पठाण’चाच डंका, कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसतंय की, ‘पठाण’ चित्रपटातील ‘झुमे जो पठाण’ हे गाणं सुरु झालं आणि प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला. याच आनंद आणि उत्साहाच्या भरात शाहरुख खानच्या एका चाहत्याने चक्क नोटा उधळून थिएटरमधील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. नोटा उडवताना तो स्क्रीनवर सुरू असलेलं ‘झुमे जो पठाण’ हे गाणंही गात आहे. आता सध्या हा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात परिधान केला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान करोना काळानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाला चांगलंच यश मिळत आहे. ‘पठाण’ प्रदर्शित झाल्यापासून शाहरुख खानचे चाहते त्याच्या मन्नत या बंगल्याबाहेर गर्दी करताना दिसत आहेत . तर काल संध्याकाळी शाहरुख खाननेही घरच्या टेरेसवर येऊन चाहत्यांना त्याची झलक दाखवली.