scorecardresearch

‘या’ मराठी चित्रपटात अशोक सराफ आणि जिनिलियासोबत झळकणार सलमान खान

याआधी सलमान खानने रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटात काम केले होते.

salman khan, ashok saraf, genelia deshmukh, riteish deshmukh,
याआधी सलमान खानने रितेश देशमुखच्या 'लय भारी' या चित्रपटात काम केले होते.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमानचं मराठीवर असलेलं प्रेम हे सगळ्यांनाच माहित आहे. सलमानने या पूर्वी अभिनेता रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. एवढंच काय तर या चित्रपटात अभिनेता अशोक सराफ आणि जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा : “हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला, म्हणाले…”, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

अशोक सराफ आणि जिनिलियाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशने केले आहे. अभिनय क्षेत्रात कारकीर्द गाजवल्यानंतर रितेशने आता दिग्दर्शनात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. या मराठी चित्रपटाचे नाव ‘वेड’ असे आहे. याच चित्रपटात सलमान एका गाण्यात दिसणार आहे. तर या गाण्याचं चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. या चित्रपटातून जिनिलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं.

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

आणखी वाचा : “साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर दिली प्रतिक्रिया

जिनिलियासह अभिनेत्री जिया शंकरदेखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी सिनेमातील गाण्यांना संगीत दिलं आहे. दरम्यान, या शिवाय सलमान शाहरुख खानच्या पठान या चित्रपटात दिसणार आहे. सध्या तो ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आहे. पूजा हेगडे, शहनाझ गिल, पलक तिवारी आणि बाकी टीमसह तो याठिकाणी व्यग्र आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan will be seen in ashok saraf and genelia deshmukh movie ved riteish deshmukh dcp