बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. नुकताच त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’चा टीझर रिलीज झाला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या टीझरनंतर शाहरुखचं नाव ट्विटरवर ट्रेंड होताना दिसत होतं. अशातच जेव्हा शाहरुखनं चाहत्यांसाठी ‘Ask Me Anything’ सेशन ठेवत त्यांच्याशी गप्पा मारल्या. यावेळी एका युजरनं जेव्हा, ‘मागच्या बऱ्याच काळापासून कुठे होतास?’ असा प्रश्न विचारला त्यावर शाहरुखनं मजेदार उत्तर दिलं.

शाहरुख खानच्या ‘Ask Me Anything’ सेशनमध्ये युजर्सनी त्याला बरेच प्रश्न विचारले आणि त्यानंही युजर्सच्या प्रश्नांची मजेदार उत्तरं दिली. एका युजरनं शाहरुखला म्हटलं, ‘चित्रपटांमध्ये येत राहा पण बातम्यांमध्ये नको.’ यावर शाहरुखनं खूपच कूल अंदाजात उत्तर दिलं. या युजरला उत्तर देताना शाहरुखनं लिहिलं, ‘ओके, पुढच्या वेळी ‘खबरदार’ राहीन. #Pathan’ या संपूर्ण सेशनमध्ये शाहरुखचा हजरजबाबीपणा दिसून आला.

आणखी वाचा- अंकिता लोखंडे पुन्हा अडकली लग्नाच्या बेडीत! पूर्ण केली आईची अपुरी इच्छा

ट्विटरवरील प्रश्नोत्तरांच्या या सेशनमध्ये शाहरुखला आणखी एका युजरनं विचारलं, ‘एवढे दिवस कुठे होतास?’ युजरच्या या प्रश्नावर शाहरुखनं खूपच मजेदार उत्तर दिलं. शाहरुखनं लिहिलं, ‘विचारांमध्ये गुंतलो होतो.’ दरम्यान मागच्या काही काळापासून शाहरुख सोशल मीडियापासून आणि चित्रपटांपासूनही दूर आहे. त्यामुळेच अशाप्रकारचे प्रश्न त्याला युजर्सनी विचारले होते. मात्र शाहरुखनं अशाही वेळी मजेदार उत्तरं देत सर्वांची मनं जिंकली.

आणखी वाचा- फरहानशी लग्नानंतर प्रेग्नन्सीच्या चर्चांवर शिबानी दांडेकरनं सोडलं मौन, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून चित्रपटाची कथा सिद्धार्थ आनंद यांनी लिहिली आहे आणि दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.