अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. तर आता त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा मुलगा अभिनय क्षेत्रात नसला तरीही खूप चर्चेत असतो. याचं कारण म्हणजे त्याचा फूड ट्रक. अनेक वर्ष फूड ट्रकचा व्यवसाय उत्तमपणे चालवल्यानंतर आता त्याने स्वतःच हॉटेल सुरू केलं आहे.

सुप्रिया पाठारे त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांची शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांचा मुलगा आता लवकरच नवीन हॉटेल सुरू करणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. तर कालच त्यांच्या मुलाच्या नवीन हॉटेलचं उद्घाटन झालं.

आणखी वाचा : “न्याय हा शब्द अर्थहीन वाटतो पण…”, प्रसिद्ध मराठी गायिकेने नितीन देसाईंच्या आत्महत्येवर केलं भाष्य, पोस्ट चर्चेत

सुप्रिया यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफशनने शेफ आहे, हे बऱ्याच जणांना माहित आहे. परदेशात लोकप्रिय असलेली फूट ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली. ‘मharaj’ असं त्या फूट ट्रकच नाव आहे. तर आता त्याने ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूट कॉर्नर सुरू  केला आहे. हे त्याचं नवीन हॉटेल ठाण्यातील खेवरा सर्कल, रामजी हॉटेलच्या समोर, पोखरण, रोड नं २ वर आहे.

हेही वाचा : Video: “ही गोष्ट माझ्या मनामध्ये…”; मिलिंद गवळींनी सुप्रिया पाठारेंचा २२ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली खंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल या हॉटेलच्या उद्घाटनाला मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. याचबरोबर सोशल मीडिया वरून या हॉटेलमधील पदार्थांच्या चवीचं भरभरून कौतुकही केलं. अभिनेता अंशुमन विचारे याच्या पत्नीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या हॉटेलची एक खास झलक सर्वांना दाखवली. आता सोशल मीडियावरून त्याच्यावर आणि सुप्रिया पाठारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.