Bigg Boss Marathi Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आता घरात केवळ ७ सदस्य बाकी राहिले असून, या सगळ्यांना ‘बिग बॉस’च्या टीमकडून खास सरप्राइज देण्यात आलं आहे. यावर्षी पहिल्यांदाच हे सगळे सदस्य शो संपण्याआधी घराबाहेर पाऊल ठेऊन मोठ्या पडद्यावर आपला घरातील प्रवास पाहणार आहेत. मंगळवारच्या भागात अंकिता, अभिजीत, निक्की आणि वर्षा यांनी आपला प्रवास रुपेरी पडद्यावर पाहिला. हे चारही जण चित्रफीत पाहून भारावून गेले होते.

आता आजच्या भागात सूरज, धनंजय, जान्हवी या तीन सदस्यांना आपला प्रवास पाहता येणार आहे. धनंजयला ‘बिग बॉस’मधील आपला प्रवास पाहून अश्रू अनावर होणार आहेत. “Grand सेलिब्रेशनच्या स्टेजवर अवतरणार डॉशिंग DP, आपल्या खेळाचे झिंगाट Moments पाहून येणार डोळ्यात पाणी” याचा खास प्रोमो ‘कलर्स मराठी’ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “अनेक बायकांचा नवरा…”, अरबाजबद्दल ‘तो’ प्रश्न विचारताच Splitsvilla फेम नायराचं मोजक्या शब्दांत स्पष्ट उत्तर, म्हणाली…

धनंजय ‘बिग बॉस’मधील प्रवास पाहून झाला भावुक

‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) धनंजयविषयी म्हणतात, “कुटुंबीयांच्या आठवणीने हळवा होणार डीपी… या डीपीचं मनोरंजन भन्नाट होतं आणि या डीपीचा खेळ रंपाट होता. हा डीपीच झिंग झिंग झिंगाट होता” आपल्याविषयीचे हे शब्द ऐकताच धनंजय भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अभिनेत्री सोनाली पाटीलने या पोस्टवर “झिंगाट दादा” अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्यांसह डीपीच्या सर्व चाहत्यांनी या कोल्हापूरच्या रांगड्या गडीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “त्याला मोठं घर, बाथरुम वगैरे माहिती नव्हतं”, ‘बिग बॉस’साठी सूरज चव्हाणने दिलेला नकार; गावात जाऊन टीमने केलेली मनधरणी

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : धनंजय झाला भावुक

हेही वाचा : Bigg Boss Marathi – पंढरीनाथच्या Elimination मुळे मराठी अभिनेत्रीला धक्का; जान्हवीचं नाव घेऊन ‘बिग बॉस’ला थेट सवाल, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात अभिजीत, वर्षा, धनंजय, अंकिता, जान्हवी, सूरज आणि निक्की असे एकूण ७ सदस्य आहेत. आता अंतिम फेरीत या सात सदस्यांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.