‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने प्रसिद्धीझोतात आले. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची बरीच माहिती आणि अनुभव ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. किरण मानेंनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : “मला अजून २-३ मुलं चालतील पण…”, जिनिलीया गरोदर असल्याच्या अफवांवर रितेश देशमुखने दिलं स्पष्टीकरण

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

देशभरात सध्या ‘जवान’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. गेले काही दिवस किरण माने त्यांच्या सोशल मीडियावरून शाहरुख खान आणि त्याच्या जवान चित्रपटाचं कौतुक करत आहेत. ‘जवान’ चित्रपटातील एका डायलॉग संदर्भात अभिनेत्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. शाहरुखच्या चित्रपटातील “उसूलों पे जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है…जो ज़िन्दा हों, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है !” हा संवाद मूळ कोणाचा आहे? त्यामागचा अर्थ आणि सद्य परिस्थितीवर किरण मानेंनी या पोस्टद्वारे भाष्य केलं आहे.

…’जवान’मध्ये शाहरूखच्या आवाजात एक सनसनीत शेर हाय,
“उसूलों पे जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है…
जो ज़िन्दा हों, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है !”

…हा शेर आजच्या परिस्थितीत लै लै लै मोलाचा संदेश देऊन जातो भावांनो. जवा-जवा आपल्यावर दडपशाहीचं सावट येतं… आपल्या पूर्वजांनी झगडून, लढा देऊन मिळवलेलं, आपलं व्यक्त होन्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं… आपल्यावर पिढ्या न् पिढ्या असलेल्या मानवतेच्या, समानतेच्या, बंधुभावाच्या संस्कारांवर घाला घातला जातो… तवा बिनधास्त नडायला पायजे, भिडायला पायजे… ‘टकराना ज़रूरी है’! तोच आपल्या जिवंत असल्याचा पुरावा असतो. नायतर सगळं सहन करत, मुकाट जगनं मुडद्यापेक्षा बदतर असतं!

…शायरीच्या दुनियेत बेताज बाहशाह असलेल्या वसीम बरेलवींचा एक दिवस फोन वाजला, “हॅलो, वसीमजी, मी शाहरूख खान बोलतोय. तुमचा हा शेर मला कायम प्रेरणा देतो. यावेळी तो माझ्या सिनेमात वापरायला मला तुमची परवानगी हवीय.” वसीमभाई म्हन्ले,”शाहरूख बेटा, तू मला आवडतोस. परवानगी देईन, पण एका अटीवर. हा शेर मी लिहून देईन, तसाच्या तसा सिनेमात तू तुझ्या आवाजात म्हणायचास.” शाहरूखनं नम्रपणे हसून होकार दिला. दोन ओळींसाठी एवढा मोठ्ठा कलाकार स्वत: फोन करून विनयशीलतेनं परवानगी मागतो याचं बरेलवींना लैच नवल वाटलं.

…खरंतर ज्यांना शाहरूखचं अफाट वाचन, तिक्ष्ण बुद्धीमत्ता, विवेकी विचारसरणी, समाजभान याविषयी माहिती आहे, त्यांना या गोष्टीचं लै नवल वाटनार नाय. असे कलावंतच न डरता, मागे न हटता, पाठीचा कणा ताठ ठेवून जगतात.

नायतर बाकी आज आपल्या सिनेमाक्षेत्रात बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत वो. फायद्यासाठी व्यवस्थेचे पाय चाटत लाचार जगनार्‍या… जातीधर्मांत द्वेषाचं विष पसरेल असा इतिहासाचा विपर्यास करणारे सिनेमे काढनार्‍या… भ्रष्ट नेत्यांकडून फंडिंग उकळत प्रोपोगंडा फिल्मस् काढनार्‍या सुमार दर्जाच्या कलाकारांची मराठी-हिंदीत सद्दी आहे. अशा नट-दिग्दर्शकांची ठरवून ‘हाईप’ केली जाते. पात्रता नसताना अनेक सरकारी पुरस्कार, पदं देऊन प्रेक्षकांवर लादलं जातं. हे पाहून कवा-कवा निराशा यायची. अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत? असा प्रश्न पडायचा…

पन प्रेक्षक येडे नसतात. पितळ आनि सोनं, काच आनि हिरा यातला फरक कळतो त्यांना… म्हनूनच त्यांनी ‘जवान’ला ठरवून डोक्यावर घेतलं. शाहरूख खान नांवाच्या अस्सल भारतीय कलावंताला भरभरून प्रेम देऊन प्रेक्षकांनी हे दाखवून दिलं की, बास झालं आता. आम्हाला मूर्ख समजू नका… ‘हम ज़िन्दा है… और ज़िन्दा नज़र आना चाहते है !’

किरण माने.

हेही वाचा : Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील दोन अवनींची हार्दिकबरोबरची मज्जा-मस्ती, पडद्यामागचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. अवघ्या दोन दिवसांमध्येच किंग खानच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०२.७३ कोटींची कमाई केली. तसेच अभिनेते किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी आई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

Story img Loader