Navri Mile Hitlerla : सध्या सर्वत्र लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी लगबग सुरू आहे. अवघ्या काही दिवसांत घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. लवकरच सर्वजण बाप्पाच्या भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघणार आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील जहागीरदारांच्या घरी जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यासाठी एजे म्हणजेच अभिरामने स्वतःच्या हाताने लाडक्या बाप्पाची सुंदर मूर्ती तयार केली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता राकेश बापटने साकारलेला एजे व अभिनेत्री वल्लरी विराजने साकारलेली लीला ही जोडी आता प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांपैकी एक झाली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. अलीकडेच मालिकेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आता गणेशोत्सव जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळणार आहे. यासाठी खास अभिरामने सुंदर गणरायाची मूर्ती तयार केली आहे.

हेही वाचा – Video: गर्दीत सुहाना खानची काळजी घेताना दिसला अगस्त्य नंदा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बच्चन कुटुंबात…”

अभिनेता राकेश बापटेने आपल्या इन्स्टाग्रामवर गणपतीची मूर्ती तयार करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राकेश स्वतःच्या हाताने मूर्ती बनवताना दिसत आहे. यात राकेशने मस्त सुंदर अशी लाडक्या बाप्पाची मूर्ती साकारल्याचं पाहायला मिळत आहे. राकेशने बनवलेल्या गणरायाची मूर्ती आता जहागीरदारांच्या घरी विराजमान होणार आहे.

हेही वाचा – खुशबू तावडेच्या वाढदिवसानिमित्ताने पती संग्राम साळवीची खास पोस्ट, आभार मानत म्हणाला, “तुझी मिठी…”

हेही वाचा – विशाखा सुभेदारचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला परदेशात, भावुक होत म्हणाली, “आज आमचा अबू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेत सध्या लीलाचं हिटलर एजेबद्दलचं मत हळूहळू बदलताना दिसत आहे. एजेची दुसरी बाजू आता समोर येत आहे. त्यामुळे दोघांचं नातं अजून खुलताना पाहायला मिळत आहे. अशातच लीलाने एजेकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. हाच मैत्रीचा हात एजे स्वीकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.