Paaru Fame Actress Dance Video : मराठीतील लोकप्रिय गायक संजू राठोडचं ‘शेकी’ हे गाणं काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. संजूच्या या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये ‘शेकी’ हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. संजू राठोडच्या याआधीच्या ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’ या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. अशातच त्याचं नावं ‘शेकी’ गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यानं फक्त नेटकऱ्यांनाच नाही, तर मराठीसह हिंदी कलाकारांनाही भुरळ घातली आहे. अनेक कलाकारांना या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. मराठी मालिका विश्वामधील अनेक अभिनेत्रींनी या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स केला आहे. त्यात आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे, ही अभिनेत्री म्हणजे संजना काळे.
‘पारू’ मालिकेमध्ये प्रिया ही भूमिका संजना साकारत आहेत. संजना काळे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर संजना तिचे अनेक स्टायलिश आणि विविध लूकमधील फोटो, तसेच रील्स शेअर करत असते. अशातच तिनं ‘शेकी’ गाण्यावरचा हटके डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. संजनाच्या या रीलला चाहत्यांकडूनही चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.
संजना काळेने शेअर केला ‘शेकी’ डान्स व्हिडीओ
संजनाच्या डान्सचं चाहत्यांनी केलं कौतुक
संजनानं शेअर केलेल्या या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत; तर १०० हून अधिक लोकांनी या डान्स व्हिडीओवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओला चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “एक नंबर”, “खूप छान”, “या साडीत खूप सुंदर दिसत आहात”, “सर्वांत सुंदर मराठी मुलगी”, “खरंच एक नंबर” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे या प्रमुख पात्रांसह इतर पात्रांनीही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. पारू, आदित्य, अहिल्यादेवी, दामिनी, श्रीकांत, प्रीतम, प्रिया, मोहन, दिशा ही पात्रं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहेत. त्यात आणखी एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.
मालिकेत काही दिवसांपासून दामिनी तिच्या भाच्याचा उल्लेख करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. हाच भाचा मालिकेत एन्ट्री करणार आहे आणि त्याचं नाव आहे परितोष. ‘पारू’ मालिकेत परितोष ही भूमिका अभिनेता सक्षम कुलकर्णी साकारत आहे. त्यामुळे आता या नव्या पात्राच्या एन्ट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार आहे आणि त्यासाठी चाहते उत्सुक आहेत.