‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका. काही महिन्यांपूर्वीच या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कथानक पूर्ण झाल्यामुळे ही मालिका ऑफ एअर करण्यात आली. त्यामुळे या मालिकेतील कलाकार मंडळी नवनवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील एका कलाकाराची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत नुकतीच दमदार एन्ट्री झाली आहे.

हेही वाचा – अभिनेत्री जुई गडकरी रमली जुन्या आठवणीत; ‘पुढचं पाऊल’ मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करत म्हणाली…

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतून ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा अभिनेता म्हणजे कुणाल धुमाळ. ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत कुणाल एका वेगळ्या भूमिकेत झळकला आहे. ‘जेजे’ म्हणजेच ‘जांबुवंत जांभळे’ असं कुणालच्या भूमिकेच नाव आहे.

हेही वाचा – “मालिकेचं नाव बदला…”; गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहून प्रेक्षकांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “मुर्खपणाचा कळस…”

‘पिंकीचा विजय असो’ मालिकेमधील काल (२० नोव्हेंबर) भागात कुणालची दमदार एन्ट्री पाहायला मिळाली. सरकार वाड्याची बोली लावताना जांबुवंत जांभळे म्हणजेच कुणालची एन्ट्री झाली. ५ करोड अशी बोली लावताना तो दिसला. तसंच त्याने तो पिंकीचा नवरा असल्याचा मोठा खुलासा देखील केला. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडतं? हे पाहणं उत्कंठवर्धक आहे.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत हर्षदा खानविलकरसह ‘या’ नव्या कलाकारांची दमदार एन्ट्री

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकले ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक; साकारतायत ‘ही’ भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेता कुणाल धुमाळच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील देवा या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अभिमन्यूच्या मृत्यूनंतर देवाची या मालिकेत एन्ट्री झाली होती. पण आता कुणालची जांबुवंत जांभळे ही नवी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते की नाही? हे येत्या काळात समजेल.