छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं. गेल्या काही वर्षांत तिने मालिकाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जुईने ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेत ‘चंदा’ ही सहायक भूमिका साकारत मालिका विश्वात पदार्पण केलं होतं. यानंतर तिने आणखी काही मालिकांमध्ये सहायक भूमिका साकारल्या. अखेर ‘पुढचं पाऊल’मुळे अभिनेत्रीचं नशीब बदललं यामध्ये जुईने साकारलेल्या कल्याणी पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सध्या जुई गडकरी ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली ही प्रमुख भूमिका साकारत आहे. ही मालिका गेल्या वर्षभरापासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अभिनयाप्रमाणेच जुई सोशल मीडियावर देखील सक्रीय असते. नुकतंच सोशल मीडियावर तिने ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी अभिनेत्रीच्या एका चाहत्याने तिला पहिल्या कमाईबद्दल विचारलं.

हेही वाचा : Video: आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीला एकत्र पोहोचले रिंकू राजगुरू अन् आकाश ठोसर, पाहा व्हिडीओ

आपल्या पहिल्या कमाईबद्दल सांगताना जुई म्हणाली, “माझी पहिली कमाई आठशे रुपये होती. दुसरीत असताना मी शोमध्ये गायले होते. तेव्हा त्याचे आठशे रुपये मिळाले होते. आठशेपैकी पाचशे रुपये पैशाच्या स्वरुपात आणि उरलेल्या तीनशे रुपयांचं बक्षिस मिळालं होतं.”

हेही वाचा : Video: CM एकनाथ शिंदेंची आयरा खानच्या रिसेप्शनला हजेरी, तर मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीसांच्या लूकने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
jui
जुई गडकरी

अभिनेत्रीच्या आणखी एका चाहत्याने “अभिनय क्षेत्रात काम करण्यापूर्वी तू फिरायला जाण्यासाठी पैसे कुठून जमा करायची?” असा प्रश्न विचारला यावर जुई म्हणाली, “मी वयाच्या आठव्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्थात मी फिरायला वगैरे आधीपासून पैसे साठवले होते.” दरम्यान, या ‘आस्क मी सेशन’मध्ये अभिनेत्रीने तिच्या अनेक चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत.