‘तू तेव्हा तशी’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. लवकरच या मालिकेत एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता विवाह बंधनात अडकणार आहे. तर आता त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी एक हटके उखाणा घेतला आहे.

या मालिकेमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. तरी आज बरोबर अभिज्ञा भावे, अभिषेक रहाळकर, उज्वला जोग, स्वानंद केतकर, रुमानी खरे हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसले. या मालिकेत स्वानंद केतकर यांनी निल हे पात्र साकारलं. काही दिवसांपूर्वीच खऱ्या आयुष्यात त्याचा साखरपुडाही झाला.

आणखी वाचा : “ते दोघेही माझे…”, पूजा सावंतने केलं वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानबरोबरच्या नात्यावर स्पष्ट भाष्य, म्हणाली…

स्वानंद लवकरच अभिनेत्री अक्षता आपटे हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. सध्या ते दोघं ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत एकत्र काम करताना दिसत आहेत. या मालिकेच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळेस स्वानंदने घेतलेल्या उखाण्याने सर्वांचंच लक्ष वेधलं.

हेही वाचा : स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या एका भागासाठी आकारतो ‘इतके’ मानधन, किंमत ऐकून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वानंदला उखाणा घ्यायला सांगितल्यावर तो म्हणाला, “आकाशात असतात सन, स्टार्स आणि मून. आई-बाबांना मी हिला भेटवलं आणि म्हटलं हीच तुमची सून.” तर आता त्याचा हा अटके उखाणा चांगलाच चर्चेत आला असून या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.